श्री. सुधाकर देर्देकर यांचे मार्फत संभाजी महाराज यांचे जीवनावर आधारित छावा चित्रपट आज परचुरी येथे मोफत दाखवण्यात येणार

गुहागर तालुक्यातील परचुरी या गावामध्ये भैरी वाघजाई ग्रामदेवतेचा शिमगोत्सव सुरू आहे. साधारणपणे आठ ते नऊ दिवस हा उत्सव सुरू असतो. त्यानिमित्ताने गावामधील ज्येष्ठ शेतकरी व आजोळ कृषी पर्यटन केंद्राचे सर्वेसर्वा श्री. सुधाकर देर्देकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा जीवनपट लोकांना समजावा तसेच त्यांची कारकीर्द आणि त्यांनी धर्मासाठी केलेले बलिदान ग्रामीण भागातील ग्रामस्थांना सहजासहजी पाहता यावे यासाठी मंगळवार दिनांक १८-०३-२०२५ रोजी ग्रामदेवता सहाण परचुरी येथे सध्या चर्चेत असलेला व तुफान गाजलेला *छावा* हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखवण्याचे नियोजन केले आहे. सदर चित्रपट हा सर्वांसाठी मोफत आयोजित केला आहे. तरी आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी हा चित्रपट पाहण्यासाठी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन गावाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments