भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २७,२८ मार्च २०२५ रोजी कोतळूक येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन
आबलोली:
२७, २८ मार्च दरम्यान राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने आयोजन.
भारतीय जनता पार्टी गुहागर तालुकाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य, आमच्या मंडळाला नेहमी सहकार्य करणारे, तवसाळ गावचे सुपुत्र, तरूण तडफदार आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्त्व श्री. निलेशजी सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि कोतळूक ग्रामदेवता श्री झोलाई व श्री वाघजाई देवीच्या पालख्यांचे सहाणेवर आगमन याचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित गुहागर तालुकास्तरीय मातीवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन ग्रामदेवता सहाणेसमोर सायंकाळी ६ वाजल्यापासून गुरूवार दिनांक २७ व बुधवार २८ मार्च २०२५ या दोन दिवस रात्र करण्यात आले आहे.
गुहागर तालुका कबड्डी असोसिएशन मान्यतेने संलग्न असलेल्या ८ संघांमध्ये साखळी पद्धतीने या स्पर्धा होणार असून
प्रथम क्रमांकास रोख रक्कम १०, ०००/- हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम ५,०००/- हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांकास व चतुर्थ क्रमांकास विजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट चढाई, पकड अशी वैयक्तिक बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहेत. या स्पर्धेदरम्यान भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा वाढदिवस २७ मार्च रोजी रात्री १० वा. साजरा करण्यात येणार आहे तरी सर्व क्रिडा प्रेमी हितचिंतक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment