गुहागर तालुक्यातील आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके यांची नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे कार्यशाळेसाठी उपस्थिती

आबलोली (संदेश कदम) 
 गुहागर तालुक्यातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांची गुहागर तालुक्यामधून आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या अनुशंगाने दि. ४ मार्च २०२५ ते ५ मार्च २०२५ या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे निमंत्रित करण्यात आले असून राज्यातील लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व अधिकारी उपस्थित राहिले असून या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके या उपस्थित राहिल्या आहेत या त्यांच्या उपस्थिती बद्दल गुहागर तालुक्यातील विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांच्या वतीने सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Comments