आम.भास्करशेठ जाधव यांच्या प्रयत्नांना यश - गुहागर आगाराला मिळणार १५ नव्या बसेस
आबलोली (संदेश कदम)
गुहागर आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या असून गेली १०-१२ वर्ष या आगारासाठी नवीन बसेस पुरविण्यात आलेल्या नाहीत. आता आगारात असणाऱ्या बसेस या खुप जुन्या झाल्या असून त्या वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. अनेक बसेस गळक्या असून पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. तात्पुरती डागडुजी करून प्रवाशांची गरज भागवली जाते. हे लक्षात घेऊन गुहागर आगाराला १५ नव्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी शिवसेना नेते, मतदारसंघाचे आमदार श्री भास्करराव जाधव यांनी आज राज्याचे परिवहन मंत्री ना. श्री. प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. यासंबंधीचे पत्र आमदार श्री. जाधव यांनी देताच ना. श्री. सरनाईक यांनी ही मागणी मान्य करून तत्काळ संबंधितांना निर्देश दिले.
मुंबईत सुरू असलेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आज आ. श्री. जाधव यांनी ना. सरनाईक यांची भेट घेतली. त्यावेळी
Comments
Post a Comment