वेळंब घाडेवाडी अंगणवाडी इमारतीचे भूमीपूजन ज्यांचा काडीचाही सबंध नाही ते आता श्रेय घ्यायला येतील-निलेश सुर्वे
आबलोली (गुहागर)
गुहागर तालुक्यातील वेळंब घाडेवाडी अंगणवाडी इमारतीचे काम हे केवळ भाजपच्या माध्यमातून मंजूर झाले असून अजूनही या गावातील दोन विकासकामे आपण भाजपच्या माध्यमातून आणली आहेत त्यामुळे उगाचच या विकासकामांच्या भूमिपूजनासाठी कोणीही धडपड करू नये ज्यांचा काडीचाही संबंध नाही ते आता श्रेय घ्यायला येतील असा गंभीर इशारा भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांनी दिला आहे.वेेळंब घाडेवाडी अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन डोंगरी कार्यक्रम जिल्हा नियोजन अशासकीय सदस्य नागेश धाडवे यांच्याहस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते.
डोंगरी विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत वेळंब घाडेवाडी येथील अंगणवाडी इमारत बांधणे काम भाजप प्रदेशाध्यक्ष व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,भाजप जेष्ठ नेते डॉ.विनय नातू,डोंगरी कार्यक्रम जिल्हा नियोजन अशासकीय सदस्य नागेश धाडवे व तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या विशेष प्रयत्नातून हे काम मंजूर झाले आहे.मात्र येथील विद्यमान सरपंच व काही राजकिय पुढारी या कामाचे फुकट श्रेय घेत असल्याने येथील नागरिक संतप्त झाले आहेत.अखेर ज्यांनी हे काम आपल्या प्रयत्नातून मंजूर केले त्यांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन पार पडले.
यावेळी भाजप महिला तालुकाध्यक्ष अपूर्वा बारगोडे,तालुका उपाध्यक्ष मंगेश रांगळे, उपसरपंच श्रीकांत मोरे,वेळंब गाव भाजप तालुकाध्यक्ष अमित ओक,बूथ प्रमुख समीर वेल्हाळ,मकरंद ओक,दीपक मोरे,वसंत माळी,संजय गुरव,चंद्रकांत रहाटे, तुकाराम रांगळे, धोंडु घाडे, सहदेव घाडे, नरेंद्र घाडे, आत्माराम बारगोडे, सुरेश बारगोडे, सुंगधा घाडे, किरण घाडे, सतीश घाडे ,सखाराम घाडे, यशवंत बारगोडे, ग्रां. पं. सदस्या वैष्णवी घाडे , अनिता घाडे,भाग्यश्री घाडे, यशवंत बारगोडे, श्रीकांत घाडे, माजी पोलीस पाटील मदन साळुखे
आनंदी घाडे,सिमरन बारगोडे, श्वेता पिंपळे, अर्चना बारगोडे, सुनिता काजारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मोरे यांनी केले.
चौकट-सदर अंगणवाडी इमारतीचे काम हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी तसेच गावचे उपसरपंच श्रीकांत मोरे व त्यांचे सहकारी ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाले आहे.तसा लेखी पत्रव्यवहार देखील आहे.मात्र तरीदेखील या कामासाठी येथील अन्य राजकिय पुढारी धडपड करत आहेत.आणि या कामाच्या भूमिपूजनासाठी धडपड करत आहेत यामुळे येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
Comments
Post a Comment