महावितरणची कार्यतत्परता

ग्राहक उपोषणसाठी बसणार म्हणून 25 जानेवारीला कामाला सुरवात करण्यात आली व 26 जानेवारीला सुट्टी असल्यामुळे उद्या काम बंद राहील असे सांगण्यात आले आणि अद्याप पर्यंत सुट्टीवरून काम करणारी लोकं आलीच नाहीत.
आणि आता त्याच ग्राहकाला चालू महिन्याचं बिल भरले नाही म्हणून वीज कनेक्शन कट करण्याची धमकी एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मग आता ग्राहक काय करणार...?
आणि महावितरण काय करणार....?
आणि त्या अधिकाऱ्याचे काय होणार..?
मार्च एंडिंग कसा होणार ग्राहकांचे काम करून की त्याची वीज कपात करून..?
महावितरण जितकी वीज बिल वसुलीला कार्य तत्परता दाखवते तितकी ग्राहकांची कामे करण्यासाठी दाखवणार का? असा सवाल ग्राहकांकडून विचारण्यात येत आहे.



Comments