वेलगूर येथे जागतिक वन दिनानिमित्त सौर चुलीचे वाटप.
वेलगूर येथे जागतिक वन दिनानिमित्त सौर चुलीचे वाटप.


दिपक चुनारकर, गडचिरोली (वेलगूर )22मार्च 2025
अहेरी तालुक्यातील वेलगूर येथे जागतिक वन दिनाच्या निमित्ताने 48 लाभार्थ्यांना सौर चुलीचे वाटप करण्यात आले. आलापल्ली वन विभाग अल्लापल्ली वनपरिक्षेत्र अहेरी. कॅपा योजनेअंतर्गत समुदायक वन हक्क गावातील लाभार्थ्यांसाठी सौरचूल वाटप कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एचडी पवार उपविभागीय वन अधिकारी वन विभाग आलापल्ली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय इंगळे वनपरिक्षेत्र अधिकारी अहेरी, मनोहर चालूरकर पोलीस पाटील वेलगूर, अरविंद खोब्रागडे प्रतिष्ठित नागरिक दीपक चूनारकर सामाजिक कार्यकर्ता, राजेश्वर उत्तरवार माजी सरपंच, आशांना दुधी माजी सरपंच हे उपस्थित होते.
अहेरी वनपरिक्षेत्रातील सी एफ आर क्षेत्रामधील नियतक्षेत्र बोटलाचेरू व वेलगुर येथील मौजा शंकरपूर व मैलाराम येथील 48 लाभार्थ्यांना सौरचूलची वाटप करण्यात आली. याप्रसंगी एसडी पवार उपविभागीय वन अधिकारी वनविभागाल्लापल्ली व माननीय इंगळे वनपरिक्षेत्र अहिरे यांनी नागरिकांना चुलीचे महत्व व त्याचा उपयोग कसा करावा याची माहिती दिली. नागरिकांचे कर्तव्य आहे की वनाचे रक्षण करणे, वनवा लागला असता ते पसरू यासाठी उपाय योजना याबद्दल मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या व त्या समस्यांची निराकरण करण्याची प्रयत्न करण्याचे माननीय पवार साहेबांनी आश्वासन दिली.
कार्यक्रमाचे संचालन व आभार माननीय एस. एफ. कन्नाके वनरक्षक बोटलांचेरू यांनी मानले.
Comments
Post a Comment