पाटपन्हाळे विद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी ( वकृत्व स्पर्धा , ऐतिहासिक वेशभूषा व पदयात्रा उपक्रमांचे सादरीकरण )
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात वकृत्व स्पर्धा , पारंपरिक ऐतिहासिक वेशभूषा सादरीकरण , ऐतिहासिक मार्गदर्शन व जय शिवाजी जय भारत पदयात्रा अशा कार्यक्रमांनी छत्रपती श्रीशिवाजी महाराज जयंती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील , पर्यवेक्षक जी.डी.नेरले , जेष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण , सौ.एस.एस.मोरे , सौ.एस.एस.विचारे - सावंत , आर.एम.तोडकरी , एस.वाय . भिडे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
मान्यवर मुख्याध्यापक , पर्यवेक्षक , शिक्षकवृंद व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांच्या हस्ते छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाध्यक्ष व्ही.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी छत्रपती श्रीशिवाजी महाराज विषयी वकृत्व सादर केले.
ज्येष्ठ शिक्षिका व सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.एस.एस.चव्हाण यांनी शिवाजी महाराजांचे बालपण , संस्कार व शिकवण , गड - किल्ल्यांची बांधणी , ऐतिहासिक वास्तूंचे महत्व , ऐतिहासिक प्रसंग व घटना , आदी अनेक मुद्यांनुसार मार्गदर्शन केले.कार्यक्रमाध्यक्ष व मुख्याध्यापक व्ही.डी.पाटील यांनी वकृत्व सादर करणा-या व बहुसंख्य उपस्थित विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून गड - किल्ल्यांचे करावयाचे जतन , अभिप्रेत देश घडविण्यासाठी आवश्यक वर्तन , जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम साजरा करण्याचा हेतू आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन करून पाटपन्हाळे विद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे विविध उपक्रम संपन्न होत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.बी.भिडे यांनी केले तर सौ.एस.एस.विचारे - सावंत यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला.
Comments
Post a Comment