आबलोलीतील शिमगोत्सवा नंतर सहाणे जवळील संपूर्ण परिसरात चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोलीच्या विद्यार्थांनी राबवले स्वच्छता अभियान

आबलोली (संदेश कदम) 
कोकण आणि शिमगोत्सव यांचं अनोखं नातं आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाईदेवींच्या पालखी भेटीचा तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. याच गळाभेटीने शिमगोत्सव उत्साहात, शांततेत व फटाक्यांच्या आतिष बाजीत, ढोलताशांच्या गजरात साजरा करण्यात आला यावेळी या शिमगोत्सवाला आबलोली, खोडदे गावातील सर्व समाजातील लोक फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर आबलोली आणि खोडदे गावातील होम गावचे खोत,मानकरी,गावकर यांचे हस्ते होम पेटविले जातात व दुपारनंतर आबलोली येथील श्री. नवलाईदेवी , खोडदे गणेशवाडी येथील श्री नवलाईदेवी, सहानेचीवाडी येथील श्री. नवलाईदेवी या तिन्ही पालख्या या तिन्ही बहिणींची गळाभेट सोहळा कै. दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानात उत्साहात,जल्लोषात संपन्न झाला या उत्सव सोहळ्यात सहाणे जवळील आजू - बाजूच्या जागेत जत्रा भरते यावेळी आबलोली - खोडदे गावातील आणि पंचक्रोशीतील जनता या संपूर्ण शिमगोत्सव आणि जत्रा उत्सवाला उपस्थित राहून देवीचा गळाभेट सोहळा पाहिल्यावर जत्रेतही खरेदी करतात यावेळी दिवसभर आलेली महिला - पुरुष आणि लहान मुले खाऊची रिकामी पाकिटे, प्लास्टिकच्या पाणी बॉटल आणि अन्य कचरा या संपूर्ण जत्रेच्या परिसरात पडलेला असतो यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या संपूर्ण जागेतील कचरा यावर्षीही चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय आबलोली या विद्यालयाच्या इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वीच्या विद्यार्थांनी विद्यालयाच्या शिक्षकांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवून संपूर्ण परिसराची साफ - सफाई करुन हा कचरा एकत्र करून या कच-याची योग्य विल्हेवाट लावली याबद्दल या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

Comments