आई नवालाईच्या तिन्ही बहिणींच्या पालखी भेटीने रंगला आबलोलीतील शिमगोत्सव

आबलोली:
कोकण आणि शिमगोत्सव यांचं अनोखं नातं आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली येथे आबलोली आणि खोडदे येथील ग्रामदेवता श्री. नवलाई देवी यांच्या पालखी भेटीचा, तिन्ही बहिणींच्या गळाभेटीचा सोहळा रंगताना दिसला याच गळाभेटीने शिमगोत्सव उत्साहात, शांततेत, व फटाक्यांच्या, ढोलताशांच्या गजरात आनंदाने साजरा करण्यात आला. हा सोहळा प्रत्यक्ष पहाताना डोळ्याचे पारणे फिटल्याचा अनूभव प्रत्यक्ष पहायला मिळाला नवलाई देवींची गळाभेट होताना दोन्ही पालखींच्या आतील नारळांची आपो - आप अदलाबदल होते. अशी अख्यांकीका सांगण्यात येते. आबलोली खालील पागडेवाडी येथील जे - जे मानकरी नऊ दिवस देवीच्या नावाने कडक उपवास करतात ते १) दत्ताराम गोणबरे, २) रमेश पांडुरंग गोणबरे, ३) सुरेश गोविंद गोणबरे, ४) दिलीप गोणबरे, ५) प्रभाकर गोणबरे,६) रमेश गोविंद गोणबरे, ७) प्रमोद रामचंद्र गोणबरे हे मानकरी नवलाई देवीच्या पालखी समोर सहाणेवर धारदार शस्त्राने स्वतः च्या उघड्या अंगावर हाणून घेतात मात्र यावेळी कुठल्याही प्रकारची त्यांना इजा होत नाही की, साधे खरचटतही नाही किंवा रक्तही येत नाही एकूणच हा पालखीभेट, गळाभेट सोहळा भक्तांसाठी, भाविकांसाठी नेत्रसुख असते या पालखीभेट गळाभेट सोहळ्याला आबलोली - खोडदे पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती. 
                       फाल्गुन पौर्णिमेच्या सकाळी सुर्योदयाबरोबर आबलोली - खोडदे येथील होम पेटविले जातात आणि दुपार नंतर आबलोली येथील श्री. नवलाई, खोडदे गणेश वाडी येथील श्री.नवलाईदेवी,खोडदे सहाणेचीवाडी येथील श्री. नवलाईदेवी या तिन्ही पालख्या या तिन्ही बहिणी आपल्या लाडक्या भावाला गोपाळजीला भेटून आल्यानंतरच आबलोली येथील कै.दादा कारेकर यांच्या जागेतील मैदानावर नाचविण्यात येतात याचवेळी दुपार नंतर सहाणेच्या आजू बाजूच्या परिसरात जत्राही भरते देवींच्या दर्शनानंतर भाविक, नागरिक, महिला, लहान मुले जत्रेत खरेदीही करतात विशेष म्हणजे आबलोली येथील श्री. नवलाईदेवीच्या पालखीला खोडदे येथील श्री. नवलाईदेवीच्या पालख्या क्रमाक्रमाने भेटतात या बहिणींची गळाभेट घेताना या देवतांमध्ये बहिणींच नातं असल्याचे ग्रामस्थ आवर्जून सांगतात.
                        यावेळी आबलोली आणि खोडदे दोन्ही गावातील लोक आपल्या खांद्यावर पालखी वाहून नेणाऱ्या भक्तांना उचलून घेतात आणि गावातील ग्रामस्थांच्या खांद्यावर ऊभे असलेल्या ग्रामस्थांच्या खांद्यावरील पालख्या वाजत - गाजत ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिष बाजीत एकमेकांची गळाभेट करतात व पालख्यांचीही गळाभेट होते. यावेळी दोन्ही पालख्यांची, दोन्ही बहिणींची गळाभेट होताना पालख्यांच्या आतील नारळांची अदलाबदल होते अशी आख्यांकीका आवर्जून सांगितली जाते.आबलोली - खोडदे येथील पालख्यांची, श्री.. नवलाईदेवीच्या बहिणींची गळाभेट होत असताना खोडदे येथील दुसरी पालखी एका बाजूला ग्रामस्थ नाचवित असतात पहिली पालखी भेटून निघून गेल्यावर दुसरी पालखी आबलोलीच्या ग्रामदेवतला भेटते अतिशय शिस्तबद्ध उत्साहात हा सोहळा पार पडला हा पालखीभेट, गळाभेट सोहळा आधुनिक युगातही तितकाच संस्मरणीय ठरतो आहे.

Comments