जागतिक महिला दिनी आबलोली सरपंच सौ. वैष्णवी नेटके सन्मानपत्राने सन्मानित

आबलोली (संदेश कदम) 
वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ वैष्णवी वैभव नेटके यांना गुहागर पंचायत समिती येथे भव्यदिव्य कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मान्यवरांच्या उपस्थितीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आबलोली गावाच्या सर्वांगिण विकासासाठी झटणाऱ्या आबलोली गावच्या सरपंच सौ वैष्णवी वैभव नेटके यांना पंचायत समिती गुहागर, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, गुहागर यांचे वतीने सरपंच सौ वैष्णवी वैभव नेटके आपण आपल्या कार्यक्षेत्रात अंत:करण पूर्वक प्रामाणिकपणे उल्लेखनीय कामकाज करीत असल्याने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त तुंम्हाला हे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तुमच्या हातून यापुढे हि असेच प्रेरणादायी कार्य घडत राहो अशा मंगलमय शुभेच्छा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी दिल्या. यावेळी विचारपीठावर महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव, कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे, एकात्मिक बालविकास प्रकल्प गुहागरच्या सुपरवायझर चैताली हळये, लिपीका सोलकर मॅडम,पर्यवेक्षिका माटल मॅडम, गुरव मॅडमआदी. मान्यवर उपस्थित होत्या.

Comments