उप मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना रत्नागिरी तर्फे रिमांड होम रत्नागिरीमध्ये मुलांना खाऊ, खेळणी वाटप
शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उप मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना रत्नागिरी तर्फे रिमांड होम रत्नागिरीमध्ये मुलांना खाऊ, चॉकलेट, लाडू, बिस्किट, खेळणी वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, उपशहर प्रमुख विजय खेडेकर, माजी नगरसेवक निमेश नायर, मुसा काजी, प्रशांत सुर्वे, प्रकाश शिंदे, सुधाकरराव सावंत, सौरव मालुष्टे, अमोल डोंगरे, उपविभाग प्रमुख सतीश मोरे, अमित बने, दीपक पवार, शेखर कोतवडेकर, स्वप्नील मयेकर, अमोल पावसकर, महिला उपशहर प्रमुख प्रेरणा विलनकर, सौ समीक्षा बालम, मानसी साळवी, राहुल रसाळ, सुनील शिवलकर, आशु मोरे, लोबस देसाई, दुर्वेश पांगम, प्रथमेश साळवी, अथर्व पांगम आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment