दापोली मध्ये शिवजयंती उत्सव झाला मोठ्या थाटामाटात साजरा

दापोली मध्ये शिवजयंती उत्सव झाला मोठ्या थाटामाटात साजरा

 *दापोली* शहरांमध्ये काल शिवजयंती निमित्त विविध मंडळातर्फे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. 
काल सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याच्या ठिकाणी केळसकर नाका येथे मोठ्या संख्येने शिवभक्त येऊन नतमस्तक होत होते. त्यानंतर कोकण कृषी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावरून आणलेली ज्योत ही सकाळी केळसकर नाका येथून वाजत गाजत विद्यापीठाच्या प्रांगणात नेली. तसेच शिवाजीनगर दापोली येथून मानाचा गणपती उत्साही गणेश मंडळ यांच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दापोली एसटी स्टँड परिसर मध्ये अनावरण करून दापोली शहरातून मिरवणूक काढून नटराज नाका या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून दिवसभर त्या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केले होते व संध्याकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपटाचे आयोजन केले होते. यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्तांनी गर्दी केली होती.
शिवजयंती उत्सव  संपूर्ण तालुक्यामध्ये शहरांमध्ये उत्साहात साजरा झाला. मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता. मिरवणूक उंट घोडे ढोल ताशे डीजे याचा सर्व समावेश होता. 

      

Comments