" रत्नागिरीचा राजा " सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरीच्यावतिने माघी गणेशोत्सव निमित्त दि. ०९/०२/२०२५ रोजी सावरकर नाट्य गृह, मारुती मंदिर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

" रत्नागिरीचा राजा " सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरीच्यावतिने माघी गणेशोत्सव निमित्त दि. ०९/०२/२०२५ रोजी सावरकर नाट्य गृह, मारुती मंदिर येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

“रत्नागिरीचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतिने माघी गणेशोत्सवाच्या निमित्त दि. ०९/०२/२०२४ रोजी सावरकर नाट्य गृह, मारुती मंदिर येथे शालेय विद्यार्थ्यांचा लहान आणि मोठा गटाची चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे अध्यक्ष श्री. राजन सुर्वे यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धा ४ गटांमध्ये घेण्यात येणार असून *गट १.* इयत्ता १ ली ते २ री चित्रामध्ये रंग भरणे दुपारी १२.०० ते १.०० वाजता होणार असुन *गट २.* इयत्ता ३ री ते ४ थी *गट ३.* इयत्ता ५ वी ते ७ वी *गट ४.* इयत्ता ८ वी ते १० वी सकाळी १०.०० ते १२.०० वाजता या वेळेत होणार असुन सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे उत्सव कमीटीचे उपाध्यक्ष श्री. योगेश कोरगावकर यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेला स्पर्धेच्या ठीकाणी चित्रकलेचा विषय मंडळाकडून देण्यात येईल तसेच स्पर्धेनंतर लगेच निकाल जाहीर करण्यात येणार असुन विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाणार असल्याचे मंडळाचे उत्सव कमीटी सल्लागार श्री. सुकेश शिवलकर आणि सहखजिनदार श्री. सिध्दराज रेडीज यांनी सांगितले.

"रत्नागिरीचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतिने दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते या वर्षी प्रथमच माघी गणेशोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा भरविण्यात आली असून रत्नागिरीच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे वरील चित्रकला स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे उत्सव कमीटी सदस्य श्री. आशिष चव्हाण यांनी आवाहन केले आहे.

“रत्नागिरीचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून दि. ०९/०२/२०२४ रोजी सावरकर नाट्य गृह, मारुती मंदिर येथील नाट्यगृहामध्ये घेण्यात येणा-या शालेय विद्यार्थ्यांचा लहान आणि मोठा गटाची चित्रकला स्पर्धेला शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थीत राहण्यासाठी पालकांकडून आणि शाळेच्या शिक्षकांकडून दरवर्षीप्रमाणे उत्तम सहकार्य मिळेल असे महीला कमीटीच्या अध्यक्षा सौ. पुजाताई जाधव यांनी सांगितले.

 *चित्रकला स्पर्धेसाठी महत्वाची सुचना* 

* *१ ली ते ४ थी क्रेऑन खडू* 
* *५ वी ते ७ वी क्रेऑन खडू किंवा वॉटर कलर* 
* *८ वी ते १० वी वॉटर कलर* 

* *सर्व विद्यार्थ्यांनी आपले कलर सोबत घेउन येणे गरजेचे आहे.*
* *मंडळाकडून स्पर्धकांना ड्रॉइंग पेपर दिले जातिल*

Comments