उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू
*उद्यापासून 10वीची परीक्षा*
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत म्हणजेच इयत्ता दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (दि. 21) सुरू होत आहे. यावर्षी मुंबई विभागातून दहावीला एकूण 3 लाख 58 हजार 854 विद्यार्थी बसणार आहेत. दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान होणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 6 या दोन सत्रांमध्ये पेपर घेतले जातील. पहिला पेपर प्रथम भाषेचा होणार आहे. शेवटचा पेपर सामाजिक शास्त्र पेपर 2 हा होईल. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment