जमिनी विकण्याचे पाप करू नका, शेती व्यवसाय, उद्योग धंद्यातून आर्थिक विकास साधूया - अशोकदादा वालम यांचे आवाहन
आबलोली (संदेश कदम)
कोकणातील शेतक-यांनो, जमीनदारांनो गांभीर्याने लक्षात घ्या की, आपल्या वाडवडिलांच्या जमिनी आहेत या जमिनी म्हणजे आपल्याला लाभलेली बलाढ्य संपत्ती आहे हि संपत्ती आपण टिकून ठेऊया आपल्या वाडवडिलांची जमिन विकण्याचा आपणास कोणताही अधिकार नाही उलट आपलं कर्तव्य आहे की, वाडवडिलांच्या जमिनीचे संपत्तीचे रक्षण करणे त्यात सुधारणा करून डेव्हलप करा जमिनदारांनो, शेतक-यांनो जमिनी विकू नका? जमिनी विकण्याचे पाप करु नका आपण शेती व्यवसाय आणि उद्योग धंद्यातून आर्थिक विकास साधूया असे जाहीर आवाहन बळीराज सेना पक्षाचे पक्ष प्रमुख,राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी केले
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील पालपेणे रोडवरील भवानी सभागृहात बळीराज सेना आयोजित व्यावसायिक मार्गदर्शन आणि महिलांसाठी हळदी कुंकू, पैठणी सोडत ,अशा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते महामानवांच्या आणि महामातांच्या प्रतिमेचे पुजन, दीपप्रज्वलन करून प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर बळीराज सेना गुहागर तालुका यांचे वतीने मान्यवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी सभेला संबोधीत करताना बळीराज सेना या पक्षाचे पक्षप्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम पुढे म्हणाले की, आपण जमिनी विकल्या तर घाणेरडे प्रकल्प येतील आणि आपण रस्त्यावर येऊ तुंम्हाला जी मदत पाहिजे ती बळीराज सेना या पक्षाकडून करण्यात येईल आमच्याकडे एक स्किम आहे जमिन तुमची डेव्हलपमेंट आमची घाबरू नका? आंम्ही तुमची जमिन विकत घेणार नाही असा सल्ला देत अशोकदादा वालम पुढे म्हणाले की, आपण तुमच्या जमिनीवर भाडेतत्त्वावर ॲग्रीमेंट करुन शेती व्यवसाय करुया प्रकल्प ऊभारुया यामध्ये जमिनदार आणि भांडवलदार यांच्या मध्ये होणा-या उत्पनाची वाटणी करु यामध्ये तुमची संमती पाहिजे
दुसरा महत्त्वाचा मुद्दा अशोकदादा वालम यांनी असा मांडला की, तुंम्ही तुमच्या मुलांना सांगितले पाहिजे की, शिकायचे तेवढे शिका भरपूर शिक्षण घ्या आणि मोठा अधिकारी बना, चांगल्या पगाराची नोकरी करा , भरपूर शिक्षण घ्या दर्जेदार शिक्षण घ्या इथपर्यंत ठिक आहे पण नोकरी कर असे सांगू नका? इथेच चुकताय तुंम्ही,नोकरी कर सांगायची चुक पुन्हा तुंम्ही करु नका तर मुलांना सांगा की, भरपूर शिका आणि शिक्षण घेतल्यानंतर व्यापारी व्यावसायिकच बना हे सांगा तेव्हाच आपण व्यावसायात ऊभे राहू असा विश्वास बळीराज सेना पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी व्यक्त केला
यावेळी पदाधिकारी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यावेळी विचारपिठावर लोकनेते शामराव पेजे कोकण आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रकाश भांगरथ, पक्षाचे उपाध्यक्ष सुरेश भायजे, सरचिटणीस प्रकाश तरळ,नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे, उपाध्यक्ष सखाराम माळी, विधानसभा संपर्क अध्यक्ष शरद बोबले, चंद्रकांत कोकमकर, सह. संपर्क प्रमुख संतोष निवाते, मनोहर घुमे, अमित काताळे, प्रशांत भेकरे, तालुका अध्यक्ष अरुण भूवड,तालुका सचिव ॲड. दिनेश कदम, संतोष पाष्टे, नंदिनी खांबे, महिला प्रमुख ऐश्वर्या कातकर, संतोष गोरीवले, प्रमोद देवळे, सुभाष रजपूत, विकास भागडे, सुरेश कळंबटे,गुहागर तालुका महिला आघाडी प्रमुख स्वप्नाली डावल, श्रावणी शिंदे विजय शिगवण, चंद्रकांत साळवी, दिप हलये, विष्णू सांगले, सुनिल वाघे, अशोक रावणंग आदी. मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यमाला आणि सभेला गुहागर तालुक्यातील जनता विशेष करून महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी केले तर सुत्रसंचालन तालुका सचिव ॲड. दिनेश कदम, मनोहर घुमे यांनी केले.
Comments
Post a Comment