भाटिमिऱ्या दत्त प्रासादिक विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय "भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५" चे बक्षीस वितरण विशेष कार्यकारी अधिकारी सिध्देश शिवलकर यांच्या शुभहस्ते संपन्न
रत्नागिरीतील भाटिमिऱ्या दत्त प्रासादिक विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय "भव्य नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा २०२५" चे बक्षीस वितरण विशेष कार्यकारी अधिकारी, समाजसेवक श्री सिध्देश शिवलकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे ग्रा.प सदस्य श्री पप्या किर, उद्योजक श्री प्रवीण वाघेला, श्री राजेश भाटकर, श्री दानिश पटेल, श्री आनंद शिंदे, श्री अक्षय हातिसकर, श्री मिलिंद पाटील, श्री नैनेश सुर्वे, श्री साहिल साटविलकर यांचा पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला तसेच या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मंडळाचे श्री रणजित ऊर्फ छोट्या भाटकर, श्री वैभव भाटकर, श्री अजित उर्फ भाई भाटकर, श्री दलजित उर्फ बंधू भाटकर, श्री अमित भाटकर, श्री आशिष उर्फ मुन्ना भाटकर, श्री लजित उर्फ बंटी भाटकर, श्री पंकज पुसाळकर, श्री सुहिल भाटकर, श्री साहिल भाटकर, श्री उमेश सावंत, श्री गणेश ढाफळे, श्री अथर्व ढाफळे, श्री सौरभ मोरे, श्री दिप भाटकर, श्री राज भाटकर, श्री ओंम भाटकर, श्री साहिल भाटकर आदि उपस्थितीत होते.
याप्रसंगी शेवटच्या हॉलीबॉल अटीतटीच्या लढतीत विजेता संघ दादागिरी L.V.C भाटिमिऱ्या व उपविजेता संघ भगवती किल्ला ठरला.
Comments
Post a Comment