ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ओणी या संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ओणी या संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
राजापूर तालुक्यातील ओणी येथील ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित ओणी या संस्थेला माननीय विभागीय सहनिबंधक कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५ जाहीर करण्यात आला आहे. उत्तम कार्याचे योगदान व गुणवत्तेमुळे एकत्रित व्यवसाय रुपये दहा लाख ते दोन कोटी पर्यंतच्या गट क्रमांक एक मध्ये हा सन्मान जाहीर झाला आहे. क्षात्रैक्य समाज हॉल कुरूळ-अलिबाग येथे दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार वितरण सोहळा माननीय आमदार श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश गजानन पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या प्रवीण करंबेळकर, नजीर टोले, प्रदीप कुळकर्णी, चंद्रकांत करंबेळकर, भरत चौगुले, प्रदीप वळंजु , प्रणाली गुरव , धनश्री पेणकर, निलेश खातू या संचालकांसह कायदेशीर सल्लागार एकनाथ मोंडे , गुरुदत्त खानविलकर यांच्या सुयोग्य कार्यपद्धतीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ही पतसंस्था ओणी, कळसवली, वडवली, शिवणे बु, वडदहसोळ, चुनाकोळवण, मंदरुळ, वाटूळ, कोंडतिवरे, तिवरे, ओझर ,कोळवणखडी, सौदळ, चिखलगाव, गोठणेदोनीवडे, नेरकेवाडी, खरवते या कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. या पुरस्कार बद्दल ओणी परिसर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे ओणी , पाचल व संपूर्ण राजापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment