दिल्लीमध्ये आपचा मोठा पराभव भाजपचा विजय
◼️ *फ्रेश न्युज रत्नागिरी* ◼️
दिल्लीमध्ये आप पक्षाचा मोठा पराभव झाला भाजपाचा विजय
दिल्ली विधानसभा
दि.08/02/25
दिल्ली येथे 70 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या त्यामध्ये 47 जागा भाजपाला व 23 जागा आप ला मिळाल्या आहेत. निवडणुकांचा निकाल हाती आला असून 27 वर्षांनतर राजधानीत कमळ फुलंल आहे. भाजपची विजयी वाटचाल असून सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारूण पराभव होताना दिसत आहे. त्यात आपसाठी आणखी एक धक्कादायक निकाल आला आहे. तो म्हणजे आपचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे पराभूत झाले आहेत. नवी दिल्लीतून केजरीवालांना पराभवाचा धक्का बसला असून भारतीय जनता पक्षाचे परवेश वर्मा हे विजयी झाले आहेत. केजरीवालांच्या पराभवाने आपच्या गोटात भूकंप झाला असतानाच आपचे आणखी एक प्रमुख नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचीही हार झाली आहे. आम आदमी पक्षाचा हुकूमी एक्काच पडल्याने पक्षाला मोठा फटका बसला आहे.
10 वर्षानंतर ‘आप’ला सतेत्तून बाहेर जावं लागलं आहे. तर भाजपला 27 वर्षानंतर सत्ता मिळाली आहे. या धक्क्यातून सावरत नाही तोच आपचे नेते, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पराभूत झाल्याने पक्षात आणखी एक भूकंप झाला आहे.
Comments
Post a Comment