वांगेपल्ली घाटावर पवित्र स्नान व शिवपूजा करण्यासाठी भाविकांची सकाळपासूनच मंदिरात गर्दी
दीपक चुनारकर :गडचिरोली (अहेरी )
अहेरी पासून तीन किलोमीटर अंतरावरील वांगेपल्ली नदी घाटावर पवित्र स्नान व शिवपूजा करण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी केली होती
. विविध प्रकारचे स्टाल ,दुकाने ,मंदिराची सजावट ,भजन ही भाविकांची आकर्षक स्थानी होती . वांगेपल्ली ग्रामपंचायत यांच्याकडूनही भाविकांना उन्हापासून विसावा मेळावा यासाठी सरपंच दिलीप मडावी व त्यांची चमू यांनी व्यवस्था केली होती . कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडवू नये यासाठी पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जतवार यांच्या नेतृत्वात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
बऱ्याच सामाजिक संघटनांकडून दूध ,पाणी व मसाला भाताचे मोफत व्यवस्था करण्यात आली होती. यात अहेरी जिल्हा निर्माण कृती समिती व त्यांचे कार्यकर्ते अग्रस्थानी होते. मंदिरात अस्थाई रूपाची व्यवस्था भाविकांना दर्शन घेण्यासाठी समितीने केली होती.
Comments
Post a Comment