महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीमधील मतदार याद्यांच्या संदर्भात काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते, खासदार राहुल गांधी आक्रमक, दिल्ली येथे काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी संयुक्त पत्रकार परिषद संपन्न
महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांची संयुक्त पत्रकार परिषद दिल्ली येथे संपन्न झाली. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला सेंट्रलाइज यादी द्यावी. मात्र निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाहीये. काहीतरी चुकीचे घडले आहे का असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. राज्याची लोकसंख्या आणि मतदार संख्या यांच्यामध्ये तफावत दिसून येत असून लोकसंख्येच्या आकडेवारीपेक्षा मतदारांची आकडेवारी कशी जास्त आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सन 2019 ते 2024 या काळामध्ये 44 लाख मतदार वाढले होते तर लोकसभा निवडणुका 2024 आणि विधानसभा निवडणुका 2024 या सहा महिन्यांच्या काळात 39 लाख मतदारांची संख्या कशी काय वाढली? निवडणूक आयोगाने आम्हाला मतदारांचे नाव फोटो आणि पत्ता असलेली सविस्तर मतदार यादी द्यावी जेणेकरून आम्ही त्याच्यामध्ये काही तपास करू शकतो. शिर्डी मध्ये एकाच इमारतीमध्ये 7000 मतदार नोंदणी कशी काय झाली? ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी मतदार वाढलेले कशी काय दिसून येतात. वाढलेली मतदार नेमके कुठ आहेत कुठून आले असा सवाल खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
या पत्रकार परिषदेवर उपस्थित असलेले संजय राऊत म्हणाले की हे मतदार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिसून आले त्याच्यानंतर दिल्ली निवडणूक मध्ये सुद्धा दिसून आले. आता ते बिहारमध्ये सुद्धा दिसून येते असा खोचक टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर लगावला.
यावेळी उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षांना देत असलेल्या चिन्हाबाबत प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस असे दोन चिन्ह देण्यात आले होते. याच कन्फ्युजन मध्ये सातारा येथील जागा आमची हरली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 11 जागा या कारणामुळे हरल्या. त्यामुळे सशक्त लोकशाहीसाठी पारदर्शक निवडणुका व्हाव्या अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment