उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून, भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून, भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महाकुंभमेळ्याचे भारताची अंतराळ संस्था इस्रोने सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो टिपले आहेत. या फोटोंमध्ये प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे. महाकुंभमेळ्यात 45 दिवसांत तब्बल 40 कोटी लोक महाकुंभ मेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.
भारताच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांचा आणि दिवसा आणि रात्री पाहण्यास सक्षम रडारसॅटचा वापर करून, हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभमेळ्यातील भव्य पायाभूत सुविधांच्या उभारणीचे अनेक फोटो कैद करण्यात आले आहेत. फोटोमध्ये उभारण्यात आलेलं तंबू शहर आणि नद्यांवर उभारण्यात आलेले पूल दिसत आहेत. एनआरएससीचे संचालक डॉ. प्रकाश चौहान म्हणाले की, त्यांनी रडारसॅटचा वापर केला कारण तो प्रयागराजला वेढलेल्या ढगांच्या पट्ट्यातून प्रदेशाचे चित्रण करू शकतो.
उत्तर प्रदेशातील प्रशासन या फोटोंच्या आधारे मेळ्यातील दुर्घटना आणि चेंगराचेंगरी कमी करण्यासाठी वापर करत आहे. 6 एप्रिल 2024 रोजी महाकुंभ सुरू होण्यापूर्वी काढलेल्या या टाइम सीरिजच्या फोटोंमध्ये प्रयागराज परेड मैदान दिसत आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2024 रोजी तिथे हालचाली होताना दिसत आहेत. यानंतर मैदानात मोठी गर्दी जमू लागल्याचं 10 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या फोटोत दिसत आहे.
नव्याने उभारण्यात आलेलं शिवालय पार्क स्पेसमधून दिसत आहे. 6 एप्रिलच्या फोटोत मोकळं मैदान दिसत आहे. यानंतर 22 एप्रिलला शिवालय पार्क उभं राहतं. यानंतर 10 जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या फोटोत भव्यता दिसत आहेत.
या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात महाकुंभ नगर हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे, जो त्रिवेणी संगम येथे साजरा केला जातो, जिथे गंगा, यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्या एकत्र येतात. यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1 लाख 50 हजार तंबू आहेत. तसंच 3000 स्वयंपाकघरे, 1 लाख 45 हजार शौचालये आणि 99 पार्किंग लॉट आहेत.
या वर्षी, प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करत आहे. महाकुंभमेळ्यासाठी सुमारे 26 हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करण्यात आली आहे आणि सुमारे 12 किलोमीटर अतिरिक्त स्नानघाट तयार करण्यात आले आहेत. आतापर्यंत आठ कोटींहून अधिक लोकांनी संगमावर स्नान केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment