*बीड प्रकरण उचलून धरणाऱ्या दमानिया अन् जरांगेंच्या अडचणी मुंडे समर्थकांनी वाढवल्या; आता 'या' शहरात गुन्हा दाखल!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*बीड प्रकरण उचलून धरणाऱ्या दमानिया अन् जरांगेंच्या अडचणी मुंडे समर्थकांनी वाढवल्या; आता 'या' शहरात गुन्हा दाखल!*

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणी काढलेल्या मोर्चात मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक टीका केली होती. त्यानंतर जरांगेंविरोधात मुंडे समर्थकांनी गुन्हे दाखल करण्याचा सपाटा चालवला आहे.

  मनोज जरांगेंविरोधात आजही नांदेड जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला. तसंच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि जरांगेंविरोधात लातूरमधील किनगाव पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.*

परभणीतील मोर्चात मनोज जरांगेंनी मंत्री धनंजय मुंडे आणि समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केली. 

 याचे राज्यभर पडसाद उमटले. बीडमधील परळी, शिवाजीनगर, अंबाजोगाई आणि धारूर इथं जरांगेंविरोधात गुन्हे दाखल झाले. यानंतर आता नांदेडच्या माळाकोळी पोलिस ठाण्यात जरांगेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या लोकांना घरात घुसून मारण्याची धमकीवजा भाषा वापरली. यामुळे सकल ओबीसी(OBC)समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्यावतीने माळाकोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माऊली गीते यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद घेतली आहे.

*दमानिया आणि जरांगेंविरोधात लातूरमध्ये गुन्हा दाखल*

याशिवाय, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून माझा मानसिक छळ सुरू असल्याचे म्हटले होते.

  यावर मुंडे समर्थक आक्रमक झाले. यानंतर दमानिया यांच्याविरोधात लातूरमधील किनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याशिवाय मनोज जरांगे यांचा देखील तक्रारीत समावेश केला आहे. किशोर गंगारामजी मुंडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी कलम 352 351/2, 351/3, आणि 3(5) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*धस, सोळुंके अन् क्षीरसागर यांच्यावर टीका*

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून बीड जिल्ह्यातील तीन टगे जातीय द्वेष निर्माण करत आहेत, असं म्हणत बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे यांनी भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन टीकास्त्र डागले. यावेळी पोटभरे यांनी मनोज जरांगे यांच्यावर देखील निशाणा साधला.

*तर विरोधात आंदोलन करणार*

बीड जिल्ह्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होत आहे. ते आता जातीय द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात आता आम्ही आंदोलन करू, हे जर त्यांनी थांबवलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू.

   त्यांचे व्यक्तिगत राजकारण आहे ते त्यांनी करावं, असंही बाबुराव पोटभरे यांनी म्हटले आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments