वेलगुरात संस्कृतीक कला गुणांची उधळण

वेलगुरात संस्कृतीक कला गुणांची उधळण 
दिपक चुनारकर (वेलगूर )

 समाजात कला संस्कारयुक्त कलावंत व खेळाडू घडविण्यासाठी शालेय जीवनात वेलगुर मधील राजे धर्मराव हायस्कूलमध्ये खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांची उधळण करून नागरिकांनी आनंद घेतला. 
         विचार मंचावर माजी सरपंच आशांनाजी दुधी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशा कस्तुरे, हुसेन निकुरे व अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रभाकर भुते उपस्थित होते.
        तीन दिवस चाललेल्या विविध सांघिक व वैयक्तिक खेळातून वर्ग पाच ते दहा च्या मुलांनी आपले कौशल्य पणाला लावले.
         26 जानेवारीला झालेल्या सांस्कृतिक महोत्सवातून भारतीय संस्कृती, देशप्रेम व देशभक्ती जागृत करण्यासाठी मुला-मुलींनी हिरीरीने भाग घेतला. 
        खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे परीक्षण करण्यात आले असून त्यांना शालेय वस्तूंचे वाटप होणार आहे. कार्यक्रमाचे संचालन जिजा गोहोकार , प्रास्ताविक विजय दंडारे तर आभार संस्कृतिक प्रमुख नंदकिशोर झोडे यांनी मांनले.
      यशस्वीतेसाठी मारोती दोनाडकर, संजय गरमाडे, अक्षय दिवसे, मळावी, कुंमरे यांनी परिश्रम घेतले.

Comments