*अपात्र लाडक्या बहिणींकडून अजिबात वसुली नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*अपात्र लाडक्या बहिणींकडून अजिबात वसुली नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कबुली*

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली असून अपात्र लाडक्या बहिणींकडून अजिबात वसुली करणार नसल्याचे म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना आपले आधार कार्ड बँकेशी जोडणे अनिवार्य होते. मात्र ज्या महिलांचे आधार कार्ड योजनेचे पैसे जमा होणा-या अकाऊंटच्या बँकेशी लिंक नव्हते अशाही महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे १५०० रूपये जमा झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान, यावरून विरोधकांनी सत्ताधा-यांना धारेवर धरले होते. अशातच आधार लिंक झाल्याशिवाय लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे गेल्याचे उघड झाले आहे.

वेळ कमी होता त्यामुळे बहिणींना आधार लिंक करता आले नाहीत, असे वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली. मागच्या वेळेला मर्यादित वेळ होता. त्यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणा-या महिलांना आधार लिंक करायचे होते. मात्र वेळ कमी असल्याने ते करता आले नाही असे सांगत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवर बोलताना थेट कबुलीच दिल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता खरंच ज्यांना या योजनेचे पैसे मिळायला हवेत त्यांनाच ते पैसे कसे जातील याकरता आम्ही योग्य पाऊले उचलत आहोत, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

तर मध्यंतरी लाडकी बहीण योजनेचे निकष धुडकावून ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता किंवा ज्या महिला अपात्र असताना त्यांनी अर्ज केला होता. त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे दंडाच्या रक्कमेसह वसूल केले जाणार अशी चर्चा होत होती. मात्र यावर अजित पवार यांनी अशा वसुलीबाबत अजिबात विचार नाही, असे स्पष्ट सांगितले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments