रत्नागिरी मध्ये मिरकरवाडा व साखरी नाटे बंदरावर ड्रोन

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

रत्नागिरी मध्ये मिरकरवाडा व साखरी नाटे बंदरावर ड्रोन 

*अनधिकृत मासेमारी आणि नौकांवर ड्रोनद्वारे नजर!*

 महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठीच्या कायद्याच्या आधारे ठाणे आणि पालघर येथील खाडी आणि समुद्र क्षेत्रातील अवैध मासेमारी आणि अनधिकृतपद्धतीने शिरणाऱ्या नौकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून ड्रोनची मदत घेण्यात येणार येणार आहे.*

ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची मॅपिंग करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होणार आहे. तर ड्रोनद्वारे किनारपट्टीवरील जलधी क्षेत्र देखरेखीखाली येणार असून वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरुन सागरी सुरक्षा बळकट होण्यास देखील मदत होणार आहे.

सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते. गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही. तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जात असतात. अशा नौकांना पकडणे जिकरीचे होत असते. 

 गस्ती नौकेसोबतच राज्याच्या जलधीक्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अशा नौकांवर सागरी कायद्यांतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोईचे होईल. तर ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे. 

 ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची मॅपिंग करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होवू शकेल, ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील जलधी क्षेत्र देखरेखीखाली येणार असून वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरुन सागरी सुरक्षा बळकट होण्यास देखील मदत होईल. या ड्रोन प्रणालीद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेवसोल्यूशन – स्ट्रिमींगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील ७ सागरी जिल्ह्यांकरिता एकूण ९ ड्रोनची (शिरगाव – पालघर (१ नग), उत्तन – ठाणे (१ नग), गोराई – मुंबई उपनगर (१ नग), ससून डॉक – मुंबई शहर (१) नग), रेवदंडा व श्रीवर्धन रायगड (२ नग), मिरकरवाडा व साखरीनाटे रत्नागिरी (२ नग) आणि देवगड-सिंधुदूर्ग (१ नग) सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात आली आहे. 

 आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
 

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments