*मार्लेश्वर - गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*मार्लेश्वर - गिरिजादेवीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न*
*सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये घुमले सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर*
*देवरुख:-राज्यातील श्रध्दास्थान असलेल्या स्वयंभू मा्र्लेश्वर तीर्थक्षेत्र येथे चि. मार्लेश्वर आणि चि. सौ. का. गिरिजादेवी यांचा विवाहसोहळा (कल्याणविधी) आज मंगळवारी दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी सनई-चौघड्यांचे मंजुळ सूर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये घुमले.
तर विवाहसोहळा संपन्न होताच उपस्थित हजारो भाविकांनी शिवहरा.. हर हर मार्लेश्वरचा जयघोष करून सह्याद्रीच्या पर्वतरांगा दणाणून सोडल्या. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी साक्षात परमेश्वराचा विवाहसोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.*
मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. मार्लेश्वरचा हा वार्षिक यात्रोत्सव सुप्रसिद्ध आहे. दि. ११ रोजी आंगवली मठात प्रथेप्रमाणे मार्लेश्वर देवाचा मांडव घालून या यात्रोत्सवाची सुरूवात झाली. दि. १२ रोजी रात्री आंगवली मठात (आताचे मार्लेश्वर देवालय) मार्लेश्वर देवाला हळद लावण्यात आली व घाणा भरण्यात आला.
दि. १३ रोजी सायंकाळी मठात यात्रा, दिंड्या, कावड, पालख्यांचे आगमन, कल्याणपुर्व विधी व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रस्थान झाले. याअगोदर देवरूखच्या व्याडेश्वराची पालखी, आंबव व लांजा येथील दिंड्या तर वांझोळेची कावड या सर्वांनी पवईला जाण्यासाठी प्रयाण केले.*
पवईतून मार्लेश्वराची पालखी, यजमान व्याडेश्वराची पालखी, दिंड्या व कावड या सर्वांनी शिखराकडे प्रस्थान केले. याअगोदर साखरप्याची गिरिजादेवीची पालखी शिखरावर पोहचली होती.
सर्वजण शिखरावर पोहचल्यानंतर मंगळवारी सकाळी मुलगी पाहणे, मुलाचे घर पाहणे, मागणी टाकणे, पसंती करणे, मानपान असे विवाहसोहळ्यापुर्वीचे विधी पार पडले. यानंतर मार्लेश्वर-गिरिजादेवीच्या लग्नाचा मुहुर्त काढण्यात आला. हा मुहूर्त शक्यतो दुपारनंतरचा काढण्यात येतो.
प्रत्यक्षात विवाहसोहळ्याला सुरूवात होण्यापुर्वी रायपाटणकर स्वामी, लांजेकर स्वामी यांना मार्लेश्वर मंदिराजवळ आणण्यात आले. त्यांची पाद्यपूजा झाल्यानंतर त्रिपूर उजळण्यात आला.*
यानंतर विवाहसोहळ्याला सुरुवात होण्यापुर्वी तब्बल ३६० मानकऱ्यांना विवाहाचे अगत्यपुर्वक निमंत्रण देण्यात आले.
यानंतर लिंगायत धर्मिय शास्त्रानुसार पंचकलशाची मांडणी करुन विवाहसोहळ्याला मंत्रघोषात प्रत्यक्षात प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रथेप्रमाणे आंगवलीचे अणेराव नवरदेवाचा म्हणजेच मार्लेश्वर देवाचा टोप मांडीवर घेवून बसले होते. तर लांजेकर स्वामी यांनी गिरिजादेवीचा टोप मांडीवर घेतला होता.
दुपारी १.१६ वाजण्याच्या मुहुर्तावर मंगलाष्टकांनी हा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. या विवाहसोहळ्याचे पौराहित्य रायपाटणकर स्वामी, राजपुरोहित प्रकाश स्वामी, रायगड, पाटगावचे स्वामी यांनी केले.
तर या विवाहसोहळ्याला अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक यशवंत केडगे, ठाकरे गटाच्या नेत्या नेहा माने आदिंसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment