बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय!
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
बलात्कार प्रकरणातील दोषी आसाराम बापूला जामीन मंजूर, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय!
एका महिला अनुयायीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसाराम बापूला ३१ मार्च पर्यंत अंतरीम जामीन मंजूर झाला आहे, पण या काळात त्यांना आल्या अनुयायांना भेटता येणार नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत.सध्या त्यांच्यावर जोधपूरच्या आरोग्य मेडीकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.*
गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आसाराम बापू या नावाने प्रसिद्ध असलेल्या आसुमल हरपलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. एका बलात्कार प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकेकाळी देशातील एक शक्तिशाली व्यक्ती असलेल्या आसाराम बापूचा अस्त झाला.
बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती. यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
बलात्काराचे गुन्हे दाखल होण्यापूर्वी आसाराम बापू लोकप्रिय धर्मगुरू होते. १९७० च्या दशकात अहमदाबादमध्ये साबरमती नदीच्या काठावर त्याने पहिला आश्रम सुरू केला होता. त्यानंतर आसाराम बापूने संपूर्ण देशभरात कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले.
त्याच्या आश्रमातील विविध उत्पादनांना आणि आध्यात्मिक साहित्यांना देशभरात प्रचंड मागणी होती. त्याच्या अनुयायांची संख्या लाखोंच्या घरात असल्याचे सांगितले जाते.
राजकीय वर्तुळातही आसाराम बापूचे अनेक अनुयायी होते. आसाराम बापूची लोकप्रियता शिखरावर असताना त्यांच्यासोबत दिसलेल्या काही राजकीय नेत्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment