*पुण्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका वाढला;*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*पुण्यात 'गुलेन बॅरी सिंड्रोम' आजाराचा धोका वाढला;* 
*रुग्णांची संख्या ५९ वर पोहचली;*

*महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर* 

पुणे:---पुण्यात दुर्मिळ गुलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा धोका वाढला आहे. ५९ संशयित रुग्ण सापडल्याने डॉक्टर देखील चिंतेत पडले आहे. 

   महापालिकेचा आरोग्य विभागही खडबडून जागा झाला आहे. त्यानंतर संबंधित रूग्णांचे चाचणी करून त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. 

  या तपासाअंती आजाराचे निदान होणार आहे. तर नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.* 

*पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ ने बाधित रुग्ण आढळले असून हा आजार बाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती व मज्जातंतूवर थेट परिणाम करतो.

  यामुळे हाता-पायांमधील ताकद कमी होते. तसेच मुंग्या येणे, गिळतांना व बोलतांना त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. 

  संशयित रुग्णांपैकी आठ रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या आजाराने बाधित सर्वात कमी वयाचा रुग्ण हा २ वर्षांचा तर सर्वाधिक वयाचा रुग्ण हा ६८ वर्षांचा आहे. 'गुलेन बॅरी सिंड्रोम' हा जीवाणू तसेच विषाणूमुळे होणारा संसर्ग आहे.

  ऑटो-इम्युन डिसीज, एखादी मोठी शस्त्रक्रिया होणे किंवा मेंदूशी संबंधित आजार, अशा विविध कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता आहे.*

प्रतिकारशक्ती शरीरातील नसांवर हल्ला करते. त्यामुळे हात-पायांमधील ताकद कमी होते तसेच शरीराच्या हालचाली देखील कमी होतात. या आजाराचे निदान हे स्पायनल फ्लुईडची चाचणी करून केली जाते. या मुळे अर्धांगवायू येण्याची शक्यता देखील असते. तसेच काही आठवडे यावर उपचार घेतल्यावर हा आजार बरा होतो. या आजारात प्रामुख्याने नसांवर परिणाम होतो तर स्नायू कमकुवत होतात. यामुळे वेदना होतात व संवेदना देखील कमी होतात. हाताची बोटं, पायांत वेदना होतात तर चालताना देखील अनेक समस्या होतात.

 'गुलेन बॅरी सिंड्रोम' ने रुग्ण आढळताच महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. बाधित ५९ रुग्णांपैकी ५ रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीत आहेत, तर अन्य रुग्ण पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भागातील आहेत. सर्वाधिक रुग्ण हे सिंहगड रस्ता, कोथरुड, कसबा भागात आढळले आहेत. रुग्ण आढळलेल्या परिसरात पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. काही भागात शुद्धीकरण न केलेले पाणी पुरवले जाते.

   त्यामुळे त्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे.*
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments