*सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास मार्च नंतरच!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*सुनीता विल्यम्सचा परतीचा प्रवास मार्च नंतरच!*
आठ दिवसांच्या मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर गेल्या वर्षीच्या जूनपासून अद्याप तिथेच आहेत. ‘बोईंग’च्या स्टारलायनर यानातील बिघाड व अन्य यान लवकर उपलब्ध न होणे हे यामागील कारण आहे. अर्थात यापूर्वीही अनेक महिने हे दोघे अंतराळ स्थानकावर राहिलेले असल्याने त्यांना आपण तिथे ‘अडकलो’ आहे असे वाटत नाही.
वैज्ञानिक प्रयोग, स्थानकाची काही कामे अशा अनेक कामांमध्ये ते गुंतलेले आहेत. हे दोघे स्थानकावर जाणार्या नव्या टीमच्या यानातून फेब्रुवारीत परत येतील असे म्हटले जात होते; मात्र आता ‘नासा’ने ते मार्चच्या अखेरपर्यंत येणे शक्य नाही असे स्पष्ट केले आहे. हे दोघे एप्रिलमध्येच पृथ्वीवर परततील.
सुनीता आणि विल्मोर यांना अंतराळ स्थानकावर जाऊन आता सात महिने झाले आहेत. एलन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ कंपनीच्या ‘क्रू 10’ मिशनच्या लाँचनंतर हे दोघे फेब्रुवारीत परत येतील, अशी अपेक्षा होती. ‘स्पेसएक्स’चे यान फेब्रुवारीत लाँच केले जाणार होते; मात्र आता त्यामध्येही विलंब झाला आहे. ते आता मार्चमध्ये अंतराळ स्थानकावर जाईल, असे सांगण्यात येते. या ‘क्रू10’ मध्ये चार क्रू सदस्य असतील. त्यामध्ये ‘नासा’चे अंतराळवीर अॅनी मॅकक्लेन (कमांडर), निकोल एअर्स (पायलट), जपानच्या ‘जाक्सा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे ताकुया ओनिशी (मिशन तज्ज्ञ) आणि रशियाच्या ‘रॉसकॉसमॉस’ या अंतराळ संशोधन संस्थेचे अंतराळवीर किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश आहे. या चार अंतराळवीरांना ‘स्पेसएक्स’चे यान अंतराळ स्थानकावर घेऊन जाईल व तेथे सध्या राहत असलेल्या टीममधील अंतराळवीरांना पृथ्वीवर आणेल. त्यांच्यासोबतच सुनीता व विल्मोरही परत येतील. मात्र हा परतीचा प्रवास मार्चच्या आधी होणार नाही हे स्पष्ट झालेले आहे.
‘क्रू-9’ मधील निक हेग, रॉसकॉसमॉसचे अलेक्झांडर गोरबुनोव्ह हे नव्या टीमकडे सूत्रे सोपवून सुनीता व विल्मोर यांच्यासमवेत परत येतील. 9 जानेवारीला ‘नासा’च्या अधिकार्यांसमवेत बोलताना सुनीता विल्यम्स यांनी म्हटले होते की, घर व कुटुंबाला सोडून आता बरेच महिने झाले आहेत; मात्र जोपर्यंत आम्ही इथे आहोत, तोपर्यंत आमच्याकडे संशोधन करण्यासाठी बरेच काही आहे’
...............................
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा