*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के उत्तर विभाग' चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के उत्तर विभाग' चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण* 

*नव्या विभागाच्या माध्यमातून ४ लाखांहून अधिक नागरिकांना मिळणार नागरी सुविधा*  

*संपूर्ण क्षमतेने नागरी सेवा पुरविणारे प्रशासकीय विभाग कार्यालय नागरिकांच्या सेवेत*

*बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विभाग कार्यालयाची संख्या पोहोचली २६ पर्यंत*

प्रशासकीय विभाग पुनर्रचनेतून नव्याने निर्मित के उत्तर प्रशासकीय विभागाद्वारे संपूर्ण क्षमतेने आणि सर्व प्रकारच्या नागरी सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विभाग कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार्‍या सुविधेमध्ये यामुळे भर पडणार आहे. नागरिकांना आपल्या नजीकच्या परिसरात सेवा सुविधा प्राप्त करणे यामुळे शक्य होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत प्रशासकीय विभाग पुनर्रचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या 'के उत्तर' या नव्या प्रशासकीय विभागाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल (दिनांक ११ ऑक्टोबर २०२४) सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री  शिंदे हे बोलत होते.

के उत्तर इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. जोगेश्वरी (पूर्व) मध्ये पूनम नगर परिसरातील हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे मजास मंडई स्थित या प्रशासकीय कार्यालय लोकार्पण सोहळ्यास खासदार श्री. रवींद्र वायकर, सहायक आयुक्त (के पूर्व) श्री. मनीष वळंजू यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, नव्या विभागासाठी सुरूवातीपासूनच आवश्यक परवानगी, मंजुरी याबाबत महाराष्ट्र शासनाने सर्व सहकार्य केले. सर्व प्रक्रिया पार पडून आज या नवीन विभागाच्या लोकार्पणाची संधी मिळणे, हे मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी भाग्याचे आहे. कारण या नव्या विभागामुळे परिसरातील जनतेची मोठी सोय होणार आहे. नागरिकांना आपल्या घराजवळ असलेल्या कार्यालयात पोहोचून नागरी सेवा सुविधा प्राप्त करता येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. 

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचा प्रकल्प संपूर्ण महानगर क्षेत्रात राबविण्यात येत आहे. त्यामुळे खड्डेमुक्त रस्ते मुंबईतील नागरिकांना अनुभवायला मिळत आहेत. तसेच मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातून नागरिकांना तसेच पर्यटकांना सर्वोत्तम अनुभव मिळाला आहे. मुंबई महानगर स्वच्छ असावे यासाठी सखोल स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात येत आहे. एकूणच मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी, महाराष्ट्र शासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत, असे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

खासदार रवींद्र वायकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, गत अनेक वर्षांपासून नागरिकांची आपल्या नजीकच्या परिसरात विभाग कार्यालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होती. नव्या के उत्तर विभाग कार्यालयातून देण्यात येणार्‍या सुविधेमुळे नागरिकांचे श्रम आणि वेळ यात बचत होणार आहे. नागरी सेवा सुविधा पुरवण्याचा वेग देखील वाढणार आहे. प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पुरवण्यात येणाऱ्या १७ प्रकारच्या नागरी सेवा-सुविधा या कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात येणार आहेत, असे खासदार श्री. वायकर यांनी नमूद केले.

के उत्तर प्रशासकीय विभागाच्या समावेशामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विभागांची संख्या २६ पर्यंत पोहचली आहे. जोगेश्वरी स्थित पूनम नगर येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका मजास मंडई इमारतीतून सर्व प्रकारच्या नागरी सेवा सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

के उत्तर अंतर्गत एकूण आठ प्रभागांचा समावेश आहे. एकूण ८.५० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या क्षेत्रात हा विभाग विस्तारलेला आहे. अंदाजे चार लाखांहून अधिक लोकसंख्येचा समावेश या विभागामध्ये आहे. शाम नगर तलाव, मेघवाडी, सर्वोदय नगर, शेर ए पंजाब वसाहत, जलाशय, जोगेश्वरी गुंफा, महाकाली गुंफा, जोगेश्वरी रेल्वे स्थानक पूर्व परिसराचा समावेश या प्रशासकीय विभागामध्ये आहे. या दहा मजली इमारतीमध्ये तळ मजल्यावर नागरी सुविधा केंद्र उपलब्ध असेल. तसेच तिसरा, चौथा आणि पाचवा मजला याठिकाणी के उत्तर विभागाचे कार्यालय असणार आहे. 

*के उत्तर विभाग*

क्षेत्रफळ - ८.५० चौरस किलोमीटर 
लोकसंख्या - ४.२५ लाख
प्रभाग संख्या - ८

*विभागातील महत्वाची ठिकाणे*

जोगेश्वरी गुंफा 
महाकाली गुंफा 
लोकमान्य टिळक शामनगर तलाव
मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान
***

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments