*आईचा विश्वास संपादन करत पाच दिवसांचे बाळ चोरले; काही तासात बाळ शोधण्यात पोलिसांना यश*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*आईचा विश्वास संपादन करत पाच दिवसांचे बाळ चोरले; काही तासात बाळ शोधण्यात पोलिसांना यश*

 नाशिक जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच दिवसांचे बाळ चोरीला गेल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ज्या महिलेने बाळ चोरले त्या महिलेने बाळाच्या आईशी काही तासांपूर्वीच ओळख निर्माण केली होती. मात्र डिस्चार्जच्या वेळी या महिलेने संधी साधत पाच दिवासांचे बाळच गायब केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत या बाळाला पुन्हा आईच्या कुशीत परत आणले.                             

मूळचे उत्तर प्रदेशचे व सध्या सटाणा परिसरात वास्तव्यास असणाऱ्या शेख कुटुंबातील सुमन अब्दुल खान हिची २९ डिसेंबरला नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रसुती झाली. बाळ बेबीकेअर युनिटमध्ये होते. त्याच दरम्यान तेथील एका संशयीत महिलेने सुमन शेख हिच्या ओळख निर्माण केली. चार पाच दिवस शेख कुटुंबासोबत या महिलेने गोड बोलणे सुरु ठेवले. तिचे नातलग शेजारच्या वार्डमध्ये अँडमिट आहे, असे तिने सांगितले होते. मात्र सुमन शेख हिच्या डिस्चार्जच्या दिवशी या महिलेने संधी साधली.                      

बाळ व मातेची प्रकृती ठणठणीत असल्याने दोघांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्याचे जिल्हा रूणालयाने सांगितले. त्यानुसार बाळाचे वडील रुग्णालयात डिस्चार्ज व कागदपत्रांची पूर्तता करत होते. त्याचवेळी महिला बाळाच्या आईजवळ आली. बोलणे सुरु असतानाच संशयित महिलेने बाळंतीणीचे कपडे, साहित्य व बाळाला मी सांभाळते व परिसरात फिरवून आणते, असे सांगितले. मातेचा तिच्यावर विश्वास असल्याने व तोंडओळखीने तिने बाळ महिलेकडे सोपविले. त्याचवेळी बाळाची आई सामान आवरत असताना महिलेने बाळाच्या आईच्या विश्वासघात करुन काही क्षणांत बाळ चोरुन पळ काढला.

*पोलिसांची तत्परता*
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी चौकशी करुन बाळाचा व महिलेचा शोध सुरु केला होता. चोरी गेलेले बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश आले. जिल्हा रुग्णालय आणि पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे चोरी गेलेलं बाळ अवघ्या काही तासात आईच्या कुशीत पोहोचले आहे. पोलिसांनी सपना मराठे (35, रा. धुळे) या महिलेला ताब्यात घेतले आहे.
.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments