१२ रोजी गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका शाखा गुहागर यांच्या वतीने महामानवांच्या व राष्ट्रमातांच्या जयंतीचे आयोजन
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील गुहागर बाजाराच्या माजी आमदार, लोकनेते, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब सभागृहात कास्ट्राईब शिक्षक संघटना तालुका गुहागर या संघटनेच्या वतीने रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता महापुरुष व राष्ट्रमाता यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.हा संपूर्ण जयंती महोत्सव कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून गुहागर तालुक्यातील कुटगीरी गावचे सुपूत्र आणि मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राध्यापक विजयराव मोहिते (पाली विभाग प्रमुख )हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. महामानवांचे बहुजन समाजाच्या शिक्षणासाठीचे योगदान व नवीन शैक्षणिक धोरण याविषयी ते मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. या जयंती महोत्सवाला जिल्हा सचिव संतोष मोहिते, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष पडवळकर, जिल्हा प्रतिनिधी व माजी तालुकाध्यक्ष सिद्धार्थ जाधव माध्यमिक कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष विश्वास खर्डे, प्राथमिक शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, संचालक चंद्रकांत झगडे, गुहागर तालुका शिक्षक समन्वय समितीचे निमंत्रक कैलास शार्दुल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र कुळये, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बेलेकर, उर्दू संघटनेचे अध्यक्ष साजिद मुकादम, अखिल प्राथमिक संघाचे अध्यक्ष मनोज पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष अमोल धुमाळ, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष दशरथ कदम आदी.मान्यवरउपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्वांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुहास गायकवाड, कार्याध्यक्ष सुधीर कांबळे, कोषाध्यक्ष सुहास जाधव, सचिव वैभवकुमार पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment