*प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे सुतोवाच!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई, एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांचे सुतोवाच!*

मुंबई : ---प्रतिबंधित प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापराविरोधातील कारवाई पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे.

   प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाई सुरू करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले असून प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या ग्राहकांवरही कारवाई करण्याचे सुतोवाच कदम यांनी केले आहे. 

   ग्राहकांवरील कारवाईसाठी दंडाची रक्कम सुधारित करण्यात येणार आहे. सध्या दंडापोटी पाच हजार ते पंचवीस हजार रुपये घेण्यात येतात..*

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.

   या बैठकीला पालिका आयुक्त भूषण गगराणी, एमपीसीबीचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांसह एमपीसीबी आणि मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

     या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत प्लास्टिक बंदीविरोधातील कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचे सिद्धेश कदम यांनी सांगितले. 

  यावेळी प्लास्टिकचा वापर करणाऱ्या ग्राहकांवरही कारवाई करण्याची कायद्यात तरतूद असून त्याचीही अंमलबजावणी केली जाईल, असे कदम यावेळी म्हणाले.

   या बैठकीत कदम यांनी पर्यावरणाशी संबंधित पालिकेच्या सर्व प्रकल्पांचा आढावा घेतला.

मोठा गाजावाजा करून सन २०१८ च्या गुढीपाडव्यापासून राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टीक बंदी लागू केली होती.

    पालिकेनेही प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणी सुरू केली होती. प्रतिबंधित प्लास्टिक विरोधातील कारवाईसाठी पथके, प्लास्टीकला पर्याय असलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देणे आदी गोष्टी सुरू केल्या होत्या.

   मात्र मार्च २०२० मध्ये आलेल्या करोनामुळे आणि टाळेबंदीच्या काळात प्लास्टिक बंदी पूर्णपणे बारगळली होती. सुरक्षेचा उपाय म्हणून पीपीई कीट पासून सर्वत्र प्लास्टीकच दिसू लागले.

   प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापरही सर्रास होऊ लागला. त्यानंतर प्लास्टिक बंदी ही केवळ नावापुरतीच उरली आहे. मात्र आता प्लास्टिक बंदीविरोधातील कारवाई पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात मिळणाऱ्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू या बहुतेकवेळा शेजारच्या राज्यातून आलेल्या असतात. 

   अशा वस्तूंचा साठा मिळाला की संबंधित राज्यांना त्याबाबत कळवले जात असल्याचे कदम यांनी सांगितले.

*दंडाची रक्कम सुधारित करावी लागणार*

दरम्यान, सध्याच्या नियमानुसार प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून कमीतकमी पाच हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. ही रक्कम खूप जास्त असल्यामुळे फेरीवाल्यांवरही कारवाई करणे शक्य नसते. 

  त्यामुळे ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जात नाही. परंतु, ग्राहकांनाही दंड लावायचा झाल्यास ही रक्कम सुधारित करावी लागेल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

*असा आहे नियम …*

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २३ मार्च २०१८ च्या अधिसुचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबंधित प्लास्टिकवर (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक) बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्रतिबंधित प्लास्टिकपासून बनवल्या जाणा-या पिशव्या (हॅण्डल असलेल्या व नसलेल्या), प्लास्टिकपासून बनविण्यात येणार्या व एकदाच वापरल्या जाणार्या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप, ताटल्या (प्लेट), पेले (ग्लास), चमचे इत्यादीसह हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणार्या प्रतिबंधित प्लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातलेली आहे.

*दंड किती?*

प्रतिबंधित प्लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसर्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसर्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व ३ महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.


*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments