*"संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक, आरोपींना वाचवण्यासाठी."; संजय राऊत यांचा आरोप!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*"संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक, आरोपींना वाचवण्यासाठी."; संजय राऊत यांचा आरोप!*

 लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव इंडिया आघाडीने केला. भाजपा हा आमचा सर्वांचा राजकीय शत्रू आहे. आम्ही एक होतो त्यामुळे लोकसभेला आम्ही चांगल्या जागा मिळवल्या. दिल्लीत दुर्दैवाने हे चित्र दिसत नाही. दिल्लीची सत्ता ले. गव्हर्नर आणि अमित शाह यांच्या तसंच मोदींच्या हाती आहे. 

 भाजपाचा पराभव करण्यासाठी आपसातले मतभेद विसरुन एकत्र येणं गरजेचं होतं असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.*

*अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हणणं योग्य नाही-राऊत*

मला आश्चर्य वाटतं आहे लोकसभेला आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढले होते. आमच्या व्यासपीठावर अरविंद केजरीवाल आले होते. दिल्लीत काँग्रेस पक्षाने केजरीवाल यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न चालवला आहे त्या गोष्टीला शिवसेनेचं समर्थन नाही. आम्ही एकत्र आहोत, एकत्र राहिलं पाहिजे. 

  टीका वगैरे होऊ शकते, राजकीय विरोध होऊ शकतो. पण अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला देशद्रोही ठरवणं योग्य नाही. असंही राऊत यांनी म्हटलं आहे. यानंतर त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांच्याबाबतही भाष्य केलं.

*धनंजय मुंडेंबाबत काय म्हणाले संजय राऊत?*

“आम्हाला पुराव्यांशिवाय तुरुंगात टाकलं होतं. त्यावेळी अजित पवार काही बोलले नाहीत. नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावा नाही वगैरे काहीही अजित पवार बोलले नाही. 

 आम्हाला गाडायचं आणि आता धनंजय मुंडेंच्या प्रकरणात पुरावा शोधायचा, बीडमध्ये खेळ चालला आहे लोकांना फसवण्याचा. ज्या पद्धतीने आरोपी, पोलीस आणि राजकारणी यांचे फोटो समोर येत आहेत. बीडच्या संतोष देशमुख प्रकरण तपासाचा फार्स चालला आहे. 

 देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं पोलीस खातं बरखास्त करा आणि संतोष देशमुख प्रकरण बीडच्या बाहेर चालवा. एसआयटीमधल्या प्रत्येक अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो आरोपीशी संबंधित आहे की नाही?” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

*अजित पवारांनी संविधानातला एव्हिडन्स ॲक्ट बदलला का?*

अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन एव्हिडन्स ॲक्ट बदलला का? हे त्यांनी सांगावं. अजित पवार हे ॲक्सिडेंटल नेते आहेत. ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळाल्या आहेत. 

 अजित पवार जर नेते असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलायला हवं होतं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा तपास ही धूळफेक आहे, आत्तापर्यंत वाचवण्याचेच प्रकार सुरु आहेत.

  सुरेश धस बोलतात आणि माघार घेतात. सुरेश धस यांनी महाराष्ट्राला बीड पॅटर्न नावाचा कलंक लागतो आहे तो पुसण्यासाठी सामान्य माणूस म्हणून उभं राहिलं पाहिजे, आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments