*पुण्यानंतर सोलापुरमध्ये घबाड, वाल्मीकच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती, पुरावे आले समोर!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*पुण्यानंतर सोलापुरमध्ये घबाड, वाल्मीकच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती, पुरावे आले समोर!*
सोलापूर :-- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मीक कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. वाल्मीक कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत असून त्याचा देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग तपासला जात आहे. दरम्यान, वाल्मीक कराडचे एक एक कारनामे समोर येत आहेत. वाल्मीक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती असून त्याने आपल्या पत्नी, मुलं आणि नातेवाईकांच्या नावावर ही संपत्ती ठेवल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांने विदेशात देखील गुंतवणूक केल्याची माहिती समोर येत आहे.*

वाल्मीक कराडने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. सुरुवातीला पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये वाल्मीक कराडचा 4 बीएचके फ्लॅट असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पुण्यातील इतर भागातही वाल्मिकने आपली दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर कोट्यवधींची माया जमवल्याचं निदर्शनास आलं.

पुण्यातील प्राइम लोकेशन समजल्या जाणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ४ ऑफिस गाळे, वाकडमध्ये एक फ्लॅट, मगरपट्टा सिटी परिसरात एका इमारतीचा संपूर्ण मजला, अमनोरा पार्कमध्ये दोन आलिशान फ्लॅट आणि खराडी परिसरात एक फ्लॅट अशी कोट्यवधी रुपयांच संपत्ती वाल्मिकने आपल्या पत्नीच्या नावे विकत घेतल्याची माहिती आधीच समोर आली आहे. यानंतर आता वाल्मीकने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्ये देखील कोट्यवधींची संपत्ती जमवल्याची माहिती समोर आली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट करत खळबळजनक दावा केला आहे. सोलापुरमध्ये ज्योती मंगल जाधव महिलेच्या नावावर चार सातबारे असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. ही महिला कोण आहे? याचा ईडीने तपास करावा, तसेच या जमिनी विकत घेण्यासाठी पैसे कुणी दिले, याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी पोस्टद्वारे केली आहे.

वाल्मिक कराड ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे असे काही माध्यमांनी दाखवले. ह्या g कोणी ह्या जमिनीचे पैसे दिले ह्याचा देखील…

अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, वाल्मीक कराडच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती मंगल जाधव आहे, असे काही माध्यमांनी दाखवलं. ह्या त्याच ज्योती मंगल जाधव आहेत का? यांच्या नावाचे हे सोलापुरातले हे ४ सातबारे आहेत. 

 ज्योती मंगल जाधव कोण आहेत? याचा तपास ED ने करावा. या जमिनीचे पैसे कोणी दिले? याचा देखील तपास झाला पाहिजे. ही खूपच मोठी जमीन आहे. जमिनी कोणी घेतल्या, पैसे कोणी आणि कसे दिले, याची चौकशी झाली पाहिजे"

वाल्मीक कराड याने दोनदा लग्न केले असून त्याच्या दुसऱ्या पत्नीचे नाव ज्योती जाधव आहे. ज्योती जाधव हिच्या नावावर वाल्मीक कराडने कुशल वॉल स्ट्रीट येथील निर्माणाधीन इमारतीमध्ये दोन ऑफीस स्पेस, हडपसरमधील एमेनोरा पार्क टाऊनशीपमध्ये दोन फ्लॅट आणि खराडी इथे एक फ्लॅट खरेदी केला आहे. या सर्व फ्लॅटची किंमत कोटींच्या घरात आहे. याशिवाय ज्योती जाधवला वाल्मीक कराडपासून दोन मुले असून त्यांच्या नावावरही त्याने मालमत्ता खरेदी केली आहे. 

  खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेला वाल्मीक कराड हा काही दिवस ज्योती जाधवकडे राहत होता, असेही आता समोर आले आहे.
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments