*तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुडेंविषयी निर्णय घेऊ; बावनकुळेंचं वक्तव्य*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुडेंविषयी निर्णय घेऊ; बावनकुळेंचं वक्तव्य*

सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आल्याने यावरुन विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारला योग्य वाटल्यास मंत्री धनंजय मुंडेंबाबत निर्णय घेतला जाईल, असं ते म्हणाले.                                        बावनकुळे हे शुक्रवारी नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग आणि जमाबंदी विभागांचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना मुंडेंच्या राजीनाम्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तपासात काही आढळून आलं तर राजीनामा मागितला जाऊ शकतो. आता याबाबत चर्चा करणं गरजेचं नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. तिन्ही संस्थांचा योग्य तपास झाल्यानंतर राज्य सरकारला वाटले तर धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. धनंजय मुंडे यांच्याबद्दल चर्चा करणे योग्य नाही. कोणत्याही व्यक्तीची बदनामी केली जाऊ नये. कोणालाही दोष देऊ नये. मात्र, ज्या दिवशी दोषी आढळतील, त्या दिवशी कोणालाही सोडले जाणार नाही, असं ते म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, गुन्हा झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी जे काही लागतं, ते सरकार करत आहे. गृहखाते प्रभावीपणे आणि पारदर्शपणे काम करत आहे. कुठल्याही व्यक्तीला वाचवण्याचं काम केलं जात नाही, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंनी अलीकडे फडणवीस यांची भेट घेतली. यावर भाष्य करतांना बावनकुळे म्हणाले की, जर ते कोणत्याही कामांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटले असतील तर त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. अनेक विषय राजकारणाच्या पलीकडे आहेत. आदित्य ठाकरे यांनी चांगल्या कारणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणे यात काहीही गैर नाही, असं ते म्हणाले.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments