*विवाहाच्या आमिषाने फसवणुक; डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*विवाहाच्या आमिषाने फसवणुक; डॉक्टर तरुणीची क्लिनिकमध्येच आत्महत्या*
 पुण्यातल्या बिबवेवाडीत धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रेमात फसल्याने एका डॉक्टर तरुणीने क्लिनिकमध्येच विषारी औषध घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका अज्ञात तरुणाने एका विवाहाच्या साईटवर अविवाहित असल्याचं भासवत लग्नाचं आमिष दाखवले आणि तरुणीकडून एकूण 10 लाख रुपये उकळले अन् नंतर लग्नाला नकार दिला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच डॉक्टर तरुणीला मानसिक धक्का बसला, आणि यातूनच तिने आपले जीवन संपविले. 

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यात बिबवेवाडीतील 25 वर्षीय डॉक्टर तरुणीची एका  मॅट्रीमोनिअल साईटवरून तरुणाशी ओळख झाली. त्यातून त्या दोघांची मैत्री झाली. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करु लागले. दोघांच्या भेटगाठी वाढल्या. डॉक्टर तरुणीचे नाव पल्लवी असं असून फसवणुक करणाऱ्या तरुणाचे नाव कुलदीप असं आहे. 

डाॅक्टर तरुणीशी त्याने संपर्क आपण साधून विवाहास उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांची देहू परिसरातील एका दवाखान्यात भेट झाली. मात्र, आरोपी तरुणाचे वागणे चांगले न वाटल्याने त्याला तरुणीच्या कुटुंबीयांनी नकार कळविला होता. त्यानंतर आरोपीने पुन्हा डाॅक्टर तरुणीशी संपर्क साधून गोड बोलत आपल्या जाळ्यात ओढले.

दरम्यान, डॉक्टर तरुणी कुलदीपच्या प्रेमात पडली. काही दिवसातच ती कुलदीपला हक्काचा माणुस समजू लागली आणि मदत म्हणून तिनं कुलदीपला 10 लाख रुपये दिले. त्यानंतर डॉक्टर तरुणीने लग्न करण्याबाबत विचारणा केली. मात्र त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. नंतर आपलं लग्न झाल्याची कबुली देत त्याची बायको गर्भवती असल्याचं कुलदीपनं पल्लवीला सांगितलं. 

डॉक्टर असलेल्या पल्लवीला हा मानसिक धक्का सहन झाला नाही. ती कोणाशी बोलेनाशी झाली. यातून ती स्वतःला सावरु शकली नाही. तिनं टोकाच पाऊल उचलत आपल्याच क्लिनिकमध्येच आत्महत्या केली. 

या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सांगलीतील  कुलदीप सावंतविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सुरु आहे.
.......................................
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments