*"तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात.", अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*"तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात.", अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?*

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेत असतात. मात्र, याच स्पष्टवक्तेपणामुळे कधी-कधी अजित पवार अडचणीत आल्याचंही पाहायला मिळतं. 

 गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात अजित पवार हे केंद्रबिंदू ठरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर बारामती राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातही चर्चेत राहिली. 

 लोकसभेची निवडणूक आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीतही सर्वांच्या नजरा या बारामतीकडे लागल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवार पुन्हा एकदा महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आहेत.*

दरम्यान, महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार परदेश दौऱ्यावर गेले होते असं सांगितलं जात होतं. आता परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं.

   बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उदघाटन त्यांच्या हस्ते पार पडले. याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

*नेमकं काय घडलं?*

एका पेट्रोल पंपाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिले जात होते. त्यानंतर अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते. 

  मात्र, याचवेळी एका कार्यकर्त्याने अनेक कामे झाले नसल्याचं म्हटलं. त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं.

   यानंतर अजित पवार हे काहीसे संतापले आणि म्हणाले, “अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. मला सालगडी केलंय का?”, अशा शब्दांत अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यावर संताप व्यक्त केला.

*अजित पवारांच्या विधानावर मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया*

“काही वेळेला असं होतं की लोकप्रतिनिधी काम करत असताना काही मतदार देखील आपण काही तारतम्य न ठेवता थेट हे काम झालंच पाहिजे असा आग्रह करतात. 

  त्यावेळेला एखाद्यावर रागावणं हे सहाजिक आहे. एखादा लोकप्रतिनिधी उलट बोलला तर त्याची बातमी होते. पण एखादा नागरिक बोलला तर त्याची बातमी होत नाही. 

 कदाचित अजित पवार यांनी रागाच्या भरात ते वक्तव्य केलं असावं”, असं शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments