*वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पशुसंवर्धन व दुग्ध क्षेत्रात क्रांती घडतेय - शरद पवार
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून पशुसंवर्धन व दुग्ध क्षेत्रात क्रांती घडतेय - शरद पवार
वाशिष्ठीच्या कृषी महोत्सवाचे भरभरून कौतुक
वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव अतिशय आनंददायी असून शेतकऱ्यांना योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न होतोय. पशुसंवर्धन व दुग्ध क्षेत्रात ते जे काम करीत आहेत, ती एक प्रकारची क्रांती आहे. वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रात काम करीत असलेल्या प्रशांत यादव यांना दापोली कृषी विद्यापीठ व तुम्हा सर्वांची साथ मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त करतांना वाशिष्ठी डेअरीचा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्यासह संचालक मंडळ व अधिकारी वर्गांचे कौतुक केले.
वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर मैदानात कृषी व पशुधन संवर्धन प्रदर्शन कृषी महोत्सव २०२५ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार भास्कर जाधव, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, संचालिका सौ. स्मिता चव्हाण, वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, माजी आमदार रमेश कदम, राष्ट्रवादीचे नेते बशीर मूर्तुझा, सत्यजित पाटणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक बबन कनावजे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, श्रीमती नलिनी भुवड, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिवसेना उबाठा चिपळूण तालुकाप्रमुख विनोद झगडे, ऍड. नयना पवार आदी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी स्वागत केले.
यावेळी शरद पवार पुढे म्हणाले की, आपण केंद्रीय कृषिमंत्री पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी देशात धान्य आयात करावे लागत होते. मात्र, नंतर देशातील शेती फायदेशीर कशी होईल? या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामध्ये कृषी क्षेत्रात आधुनिकता, नवीन तंत्रज्ञान याचा उपयोग करून शेतकऱ्यांचे हित जोपासून देश कृषी क्षेत्रात अग्रेसर राहिल, यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले गेले. यामुळे भारत देश तांदूळ उत्पादनात जगात प्रथम क्रमांकाचा देश बनला. कालांतराने भारत देश धान्य निर्यातीत १८ व्या क्रमांकाचा बनला, असे शरद पवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, शेतीसाठी पाणी नियोजनाची गरज आहे. तसेच उत्तम बी- बियाणे असली पाहिजेत. तसेच शेतीबरोबर पशुपालन हा जोडधंदा केला पाहिजे. तरच शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृद्ध होऊ शकतो, असे पवार यांनी यावेळी सांगताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाची दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील वाटचाल कौतुकास्पद असून शरद पवार यांनी कृषी महोत्सवासाठी मोठी जागा घेऊन स्टॉलच्या बाजूला नवीन भात बी-बियाणांच्या जातीची पेरणी करून ते पीक कसे येते? याची माहिती शेतकऱ्यांना दिली तर शेतकरी अधिक जोमाने कृषी क्षेत्रात काम करेल, असा सल्ला दिला.
कोकणात मत्स्य, कृषी पशु, दुग्ध क्षेत्रात मोठी संधी आहे. कोकणचा चेहरा मोहरा बदलतोय तो आणखी बदलेल आणि कोकणचा भाग संपन्न होईल. या भागाचा नावलौकिक होईल असा विश्वास व्यक्त करताना वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने या दृष्टीने आणखी पावले टाकावीत
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
*70301 66666*
Comments
Post a Comment