आबलोली येथे रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांच्या वतीने श्री.सत्यनारायण महापुजेसह अधिकृत रिक्षा थांब्याचे उदघाटन उत्साहात संपन्न.
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील आबलोली येथे रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोली यांच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी नुतन वर्ष २०२५ या वर्षाच्या स्वागतासाठी नुतन वर्ष प्रारंभी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सकाळी ८:०० वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली होती यामध्ये महाआरती व तिर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी ११:०० वाजता अधिकृत रिक्षा थांब्याचे उदघाटन आबलोली गावच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके ग्रामविकास अधिकारी श्री.बाबूराव सुर्यवंशी,मोहन पागडे ,पोलिस पाटील महेश भाटकर यांचे हस्ते पुजन दीपप्रज्वलन आणि श्रिफळ वाढवून करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ७:०० वाजता आबलोली - खोडदे गावातील स्थानिक मंडळाचे सुस्वर भजन उत्साहात संपन्न झाले त्यानंतर रात्रौ ९:०० लकी ड्रॉ सोडतीचा भाग्यवान विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर रात्रौ १०:०० वाजता संगमेश्वर तालुक्यातील श्री. ग्रामदेवता लोककला नाट्य - नमन मंडळ यांचा बहुरंगी - बहूढंगी नमनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या संपूर्ण कार्यक्रमासाठी आबलोली पंचक्रोशीतील जनता बहुसंख्येने उपस्थित होती.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटना आबलोलीचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष गोपिनाथ शिर्के, कोषाध्यक्ष अनिल साळवी, सचिव अजित मोहिते, सह. सचिव प्रशांत कदम, सल्लागार प्रविण भंडारी, धनदिप साळवी, प्रकाश चाचे, दौलत शिर्के, दिनेश पागडे, सदस्य योगेश साळवी, तुषार भोजने, समीर चाचे, मंगेश मास्कर, अमित निवाते, सर्वेश पवार, संदिप दिवेकर, मनोज भोजने, दत्ताराम साळवी, मनोज पवार, अमित करंजकर, प्रशांत गोणबरे, प्रशांत सुर्वे, राजेश मोहिते, ऋषिकेश झगडे, निरंजन सुर्वे, सागर चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.
Comments
Post a Comment