दोन वर्षाची मजुरी थकीत असतानाही नवीन कामाचा आग्रह वनविभागाचा अफलातून प्रकार
By -दिपक चुनारकर
वनविभागाचा अफलातून प्रकार दोन वर्षाची मजुरांची मजुरी "नादेय" असतानाही नवीन कामांचा आग्रह
@ मगारारोहमी योजनेतील 15 कोटी "थकीत "
सन 2022 -23 व 2024-25 या दोन वर्षांची मजुरी जवळपास 15 कोटीच्या वर निधी नादेय असतानाही वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवरून आलापल्ली वन विभागाला नवीन काम करण्याचा आग्रह का करण्यात येतो? हा अधिकाऱ्यांसह मजुरांना पडलेला शंकास्पद प्रश्न वाटतो ?
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2022-23 व 2024 -25 या वित्तीय वर्षात बऱ्याच मजुरांची मजुरी एफटीओ द्वारे जमा करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. परंतु मजुरी मजुरांच्या खात्यात अजून पर्यंत जमा झालेली नसल्यामुळे मजुरांकडून वेळोवेळी वनविभागाला विचारणा केले जाते . मात्र आश्वासनाशिवाय काही मिळत नाही .यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सुद्धा विचारणा करण्यात येते मात्र ते सुद्धा व्यर्थ.
सत्र 2024 -25 वर्षाचे 95 हजार 736 मजुरांच्या व्यवहाराचे 15 कोटी 21 लाख 33 हजार 625 तर 2022 -23 करिता 382 मजुरी व्यवहाराचे एकूण पाच लाख 62 हजार 634 असे एकूण 96 हजार 118 व्यवहाराचे एफ टी ओ रुपये 15 कोटी 26 लाख 96 हजार 259 अकुशल निधी आजपर्यंत प्रलंबित आहे .
सदर प्रलंबित असलेल्या अकुशल निधी मजुरांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्याचे सूतोवाच केले जाते.
मात्र निधी उपलब्ध न करता नवीन मगांरारोहमी च्या कामांना सुरुवात करण्यात प्रोसाहीत केले जाते.
दोन वर्षाची मजुरी न मिळालेले मजूर पुन्हा कामावर येतील का ? वरिष्ठ स्तरावरून निधी उपलब्ध करून पत्र का काढत नाही? असे मजुरांची उपासमार करून पुन्हा काम करून घेणे संबंधित अधिकाऱ्यांसमोर "इकडे आड तिकडे विहीर" असा प्रसंग आडवा येत आहे.
Comments
Post a Comment