पावस जवळील समुद्रात कर्नाटक मलपी बोटीचा थरार मस्त्य विभागाच्या गस्ती बोटीची ढाल कापली भर मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

ब्रेकिंग 

पावस जवळील समुद्रात 
 कर्नाटक  मलपी बोटीचा थरार मस्त्य विभागाच्या  गस्ती बोटीची ढाल कापली भर मध्यरात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास हा थरारक प्रकार घडला.
   दरम्यान मत्स्य विभागाच्या गस्तीनौकेवरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क तीन वाजता साधला आणि त्यांनी तिथल्या स्थानिक मच्छीमारांना तात्काळ संपर्क केला. तसेच जिल्हा पोलीस यंत्रणेला ही संपर्क केला.

स्थानिक मच्छिमारा मुळे मत्स्य विभागाचे कर्मचाऱ्यांचे जीव वाचले.

   मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक बोटी रत्नागिरी जवळील  समुद्रकिनारी मासेमारी करत असतानाचे आढळून आले.

  तात्काळ मत्स्य विभागाची गस्ती बोट तिथे गेली पण बोट  येत आहे हे पाहिल्याबरोबर या लोकांनी तात्काळ या गस्तीनौकेची ढाल कापली दोर कापले त्यामुळे मस्त्य विभागाची बोट काही करू शकत नव्हती.

  तात्काळ त्यांनी मंत्री उदय सामंत यांना संपर्क केला त्यांनी त्या परिसरातील मच्छीमरानशी संपर्क साधून तात्काळ समुद्रात जाण्यास सांगितले.

 आणि मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीतल्या बोटी जमा झाल्याने सहाजिकच कर्नाटक मलपी बोट येथील सात जणांना पकडण्यात या  मत्स्य विभागाला यश आले आहे.

दरम्यान स्थानिक मच्छिमारांनी  जीवावर उदार होऊन मलपी बोट  पकडली.

या मलपी बोटी कोकणाच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावर मासेमारी करत असतात परंतु ते  पूर्वी बारा  वाव च्या बाहेर करत असतात परंतु आता ते अगदी रत्नागिरी समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मासेमारी करत असल्याचे दिसून येते.

  या बोटीने  अत्याधुनिक आहेत.या बोटीवर  काम करणारे खलाशी हे  काही न बघता हल्ला करणारे असल्यामुळे या बोटीने पकडणं कठीण झालं आहे.

 आज मध्यरात्री 
मलपी येथील 35 - 40 हायस्पीड ट्रॉलर  नौका निदर्शनास आल्या. 

 या नौकांचा पाठलाग करत असता नौका "अधिरा" IND-KL-02-MM5724 या नौकेचा ताबा घेताना इतर नौकांनी गस्ती नौका घेरण्याचा प्रयत्न केला. 

  तसेच पकडलेल्या नौकांवरील खलाशांनी गस्ती नौकेवरील  कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

  दरम्यान प्रसंगावधान राखून पकडलेली नौका सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतली.
       इतर नौकांनी घेरण्याचा प्रयत्न केल्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहून नौकेवरील कर्मचाऱ्यांनी सदर बाब सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या निदर्शनास आणताच आजूबाजूच्या मासेमारी करणाऱ्या लोकांना संदेश देऊन गस्ती नौकेला मदत करण्यासाठी विनंती करण्यात आली.  

  दरम्यान मंत्री उदयसामंत यांनी स्थानिक मच्छीमार यांच्या शी संपर्क साधताच आठ ते दहा मासेमारी लोकांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. 

पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क करून अतिरिक्त पोलीस बळ उपलब्ध करून मिरकरवाडा येथील नौके वरून पाठवण्यात आले.

. मलपी येथील नौकांनी गस्ती नौका मार्गक्रमण करीत असल्याचे पाहताच नौकेवरील दोऱ्या समुद्रात सोडल्या त्यातील दोरी गस्तीनौकेच्या फॅनमध्ये अडकल्याने गस्ती नौका जागेवर बंद पडली. 

 गस्ती नौका बंद पडल्यामुळे इतरत्र नौकांनी हल्ला करण्याचा प्रसंग जीवावर बेतणारा होता. 

  मात्र स्थानिक नौकांची मदत, अतिरिक्त पोलिसांची कुमक  या सर्व प्रसंगावधान बाबींमुळे पकडलेली नौका तसेच गस्ती नौका टोईंग करून मिरकरवाडा बंदरात आणण्यात  आल्या. 

  सदरच्या नौकेवर म.सा. मा. नि. अ. 1981 अंतर्गत दावा दाखल करण्याची कारवाई आज करण्यात येईल.

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.

*70301 66666*

Comments