*बिबट्याच्या पाळीव प्राण्यांवरील शिकारीत वाढ!*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*बिबट्याच्या पाळीव प्राण्यांवरील शिकारीत वाढ!*
पिंजऱ्यासाठीच्या जाचक अटी; नागरिकांचा रोष वनविभागावर
बिबट्यांच्या संख्येवर वेळीच नियंत्रण मिळविण्याची गरज - निलेश कदम
संगमेश्वर तालुक्यात बिबट्यांची दहशत कायम असून, बिबट्यांकडून शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले आहेत. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांसह भेटके श्वान व अन्य प्राण्यांचा फडशा बिबट्याने पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्यांनी भक्ष्य शोधार्थ आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवल्याने तसेच दिवसाढवळ्या लोकांना दर्शन होऊ लागल्याने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यासाठीच्या जाचक अटींमुळे सहजासहजी पिंजरा उपलब्ध होत नाही. तर वनाधिकारी व कर्मचारी पिंजरा लावण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला धुडकावत असल्याचा स्थानिकांचा समज होत आहे.
तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांची संख्या सतत वाढत आहे. बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांच्या शिकारीच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. बिबट्यांचा वावर हा पूर्वी जंगल भागात तसेच शेतशिवारात असायचा, मात्र आता मानवी वस्ती, वर्दळीचे रस्ते आदी ठिकाणी वळू लागल्याने बिबट्याची दहशत हा ग्रामीण भागासह शहरातही चिंतेचा विषय बनला आहे. सध्या दिवसाउजेडी बिबट्या दिसू लागल्याने शेतात काम करताना शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याची भीती दूर करण्यासाठी तसेच मुक्या जनावरांना त्यांची शिकार होण्यापासून वाचवण्यासाठी बिबट्यांना जेरबंद करणे गरजेचे असतानाही पिंजरा लावण्याची परवानगी दिली जात नाही.
बिबट्याला पकडण्यासाठी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 11 (अ) अंतर्गत परवानगीची मागणी करण्याबाबत नियमावली ठरविण्यात आली आहे. त्या अन्वये मानवी जीवितास धोकादायक ठरल्यास किंवा बरे होण्याच्या पलीकडे रोगग्रस्त झालेल्या किंवा अपंग झाल्यास अशा वन्य प्राण्याला पकडण्यासाठी किंवा त्याची शिकार करण्याची परवानगी देता येत असते.
पाळीव प्राण्यांची शिकार तसेच गाव, मानव वस्तीत बिबट्या दिसला अथवा त्याच्यामुळे भीतीचे, दहशतीचे वातावरण निर्माण झाले, अशा मोघम सबबीवर वन्य प्राण्यांना जेरबंद करता येत नाही, असे स्पष्ट आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे यापूर्वी असल्याने बिबट्या मानवी जीवितास धोकादायक ठरला आहे. याबाबतचे सबळ पुरावे, तसेच त्यानुसार जखमी वा अपंग झालेल्या बिबट्याबाबतचे पुरावे जोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठविणे बाबतचे आदेश देण्यात आले आहेत. पाळीव प्राण्यांची शिकार, दहशत, भीती अशा प्रकारच्या मोघम स्वरूपाच्या कारणावरून तसेच पाळीव प्राण्यांची शिकार होऊन देखील तेथे पिंजरा लावण्यास वनविभागाच्या वतीने परवानगी मिळत नाही.
बिबट्यांची संख्या कमी असताना त्यांच्या संरक्षणासाठी कडक कायदे केले गेले होते. परंतु सद्यस्थितीत बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळीच निर्णय घेण्याची गरज आहे, असे संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विशेष कार्यकारी अधिकारी निलेश कदम यांनी म्हटले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment