*उशिरा होणाऱ्या जन्म-मृत्यूच्या नोंदी तत्काळ थांबवा!*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*उशिरा होणाऱ्या जन्म-मृत्यूच्या नोंदी तत्काळ थांबवा!*
 बांगलादेशी, रोहिंग्यांना बोगस दाखले दिल्याच्या प्रकरणावरून सरकारचे आदेश    


 एक वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर होणाऱ्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदी करून त्याचे प्रमाणपत्र देण्यास राज्य शासनाने तत्काळ स्थगिती दिली आहे. या बाबतच्या सक्त सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. सध्या विविध जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी अथवा रोहिंग्यांना बोगस दाखले दिल्याची प्रकरणे उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने हे आदेश जारी केले आहेत.

एका वर्षाच्या विलंबानंतर जन्म- मृत्यूच्या नोंदी करण्याचे अधिकार या पूर्वी न्यायालयाला होते. मध्यंतरी केंद्र शासनाने जन्म मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यू नोंदणी संबंधीचे अधिकार जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांना दिले . प्रामुख्याने मालेगाव, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी व्यक्तींना जन्म दाखले दिल्याची प्रकरणे उघडकीस आली होती.

या संदर्भात भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत बोगस दाखले देणे थांबविण्याची मागणी केली होती. प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांकडून बोगस कागदपत्रांच्या आधारे मालेगावमध्ये 4,318 आणि अमरावतीमध्ये 4 हजार 537 लोकांना जन्म दाखले देण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.                 

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महसूल विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी आल्या आहेत. त्यांची चौकशी करण्यासाठी गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

टिप्पण्या