गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गणेश गोरे सेवानिवृत्त.


गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद गणेश गोरे सेवानिवृत्त.

डॉ श्री मिलींद गोरे 1988 साली महाविद्यालया च्या रसायनशास्त्र विभागात रुजू झाले. गोरे सर 2008 पासून रसायनशास्त्र विभाग प्रमुख (H.O.D., Chemistry Department)  म्हणून कार्यरत होते. सरांनी 36 वर्षांची प्रदीर्घ सेवा महाविद्यालयामध्ये दिली आहे.  31 डिसेंबर 2024 रोजी ते निवृत्त झाले.

NCC साठी सुद्धा अनेक वर्षे सरांनी काम केले आहे. ह्यामध्ये आर्मी विंग च्या मेजर पदापर्यंत ते पोहोचले. 
परीक्षा विभाग, सह्याद्री mountaineering क्लब, KTS अशा अनेक समित्यांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान सरांनी दिलेले आहे.
सरकार मान्य माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात अत्यंत महत्त्वाचे योगदान डॉ श्री गोरे यांचे आहे. रत्नागिरी शिक्षण संस्थेचे ते आजीव सभासद आहेत.
अनेक वेळेला syllabus तयार करण्याच्या समितीमध्ये सरांची निवड
झालेली आहे. 2015 साली लायन्स क्लब रत्नागिरी तर्फे Best Teacher Award द्वारे सरांना सन्मानित करण्यात आले आहे. 2015 ते 2018 ह्या कालावधीत सरांनी Vice principle पदाची जबाबदारी उत्तम पार पाडली आहे.

साधे राहणीमान असलेले परंतु विद्यार्थीप्रिय - सर्वांचे आवडते शिक्षक म्हणून पदवी आणि पदव्युत्तर विभागात सुद्धा सर्वाना परिचित आहेत.

निवृत्तीपूर्वी रसायनशास्त्रज्ञ विभाग गोगटे जोगळेकर कॉलेज तर्फे डॉ मिलिंद गणेश गोरे यांचा  यथोचित सत्कार करण्यात आला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयामधील सर्वांतर्फे सरांना पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments