*बुलढाण्यात पकडलेला वाळूचा ट्रक घेऊन जात असताना तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून दिले फेकून*

*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*

*वाळू माफियांची मुजोरी;* 
*बुलढाण्यात पकडलेला वाळूचा ट्रक घेऊन जात असताना तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून दिले फेकून*

*तलाठ्यास चिरडण्याचा प्रयत्न*

बुलढाणा :--- मागिल काही दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातल्या देऊळगावराजा तालुक्यातील महसूल विभागाच्या आशीर्वादाने खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध रेती उपसा आणि वाहतूक जोमाने सुरू आहे. 

  दरम्यान देऊळगावराजाचे तलाठ्याने अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर कारवाईसाठी अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला.तर दुसऱ्या घटनेत पकडलेला वाळूचा ट्रक घेऊन जात असताना तलाठी व कोतवालास धावत्या ट्रकमधून फेकून दिल्याची घटना घडली आहे.*

  बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुका हा अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

 मात्र बुलढाणा जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी मोठी पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील महसूल प्रशासनाला अवैध रेती वाहतूकदारांवर कदम कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.*

*तलाठ्याने पकडला वाळूचा डंपर* 

*जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार काल सायंकाळी नांदुरा शहराजवळ नांदुरा तहसीलचे तलाठी नितीन म्हस्के व कर्मचारी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी थांबले.

  यात एक अवैध रेतीचा डंपर त्यांनी थांबवला. यानंतर चालकास कागदपत्रे विचारले असता त्याकडे काही आढळले नाही. म्हणून सदर तलाठी व कोतवाल अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये बसले व ट्रक सरळ तहसील कार्यालयात घेऊन जाण्याचे चालकाला सांगितले.*

*तलाठी, कोतवालास ट्रकमधून फेकले*

*मात्र चालकाने त्यांना शिवीगाळ करत ट्रक भरधाव मलकापूरकडे घेतला. यानंतर धावत्या ट्रकच्या केबिनमधूनच तलाठी व कोतवालास लाथ मारून ट्रक खाली ढकलले. 

  यात कोतवाल व तलाठी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नांदुरा पोलिसांनी गंभीर कलमान्वये ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

 अद्याप ट्रक चालक फरार आहे. यामुळे मात्र बुलढाणा जिल्ह्यात रेतीमाफी यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे.*

*तलाठयांस चिरडण्याचा प्रयत्न*

देऊळगावराजा तालुका हा अवैध वाळू तस्करांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मात्र स्थानिक महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू असलेली रेती माफियागिरी आज त्यांच्याच विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर उठल्याचे पाहण्यास मिळाले. 

   देऊळगावराजाचे तलाठी परमेश्वर बुरकुल यांनी अवैध रेती वाहतूक करणारा डंपर कारवाईसाठी अडविण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने भरधाव असलेला डंपर त्यांच्या अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला.

  परंतु, बुरकुल यांनी बाजूला उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना जबर मार लागला असून मेंदूला मार बसला आहे. त्यांच्यावर सध्या जालना येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.*

https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*

ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099

* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त 
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o

RNI-MAHMAR/2011/39536

 पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती 
〽️📧
freshnewsindia24@gmail.com

या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.

मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648

https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL

आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505

*मँगो सिटी रियल इस्टेट


mangocityindia@gmail.com
70301 66666

*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*

ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी


आपला विकास...हाच आमचा ध्यास...

गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39

Comments