संगमेश्वरचे उप अभियंता कांबळे साहेब यांचेशी चर्चा
----------------------------------------
✒️ *सत्यमेव जयते न्युज*
*संगमेश्वर*
====================
*माहितीचा अधिकार कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे संगमेश्वर चे वतीने जलजीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या कामांबाबत ग्रा.पा. पुरवठा जि.प.उपविभाग संगमेश्वरचे उप अभियंता कांबळे साहेब यांचेशी चर्चा*
*तालुक्यातील कामांबाबतची आलेल्या तक्रारींची दाखल घेण्याबाबत उपअभियंता श्री कांबळे यांचे आश्वासन*
उपस्थित ग्रामस्थांनी पाण्या पासून वंचित ठेवल्या बाबत उपअभियंता श्री कांबळे यांना प्रत्यक्ष समक्ष पहाणी करावी.या वर आम्ही पहाणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मनोहर गुरव व संगमेश्वर तालुका अध्यक्ष शेखर जोगळे यांनी जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या निकृष्ट आणि नियमबाह्य कामांचा पाढा वाचला.सातत्याने दिलेल्या अर्जा वर प्रभारी उप अभियंता श्री लठाड यांनी कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
यावेळी नवले वाडी, देव धामापूर पूर,पाटगाव,घोडवली, साडवली, उजगाव,कळंबोशी, केतकवणे वाडी,आंबव पोंक्षे, बुरंबी तेऱ्ये देव धामापूर, कडवई, अशा अन्य गावातील जल जीवन योजनें तर्गत झालेल्या कामांबाबत चर्चा करण्यात आली असता प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन देण्यात आले.
लोक प्रतिनिधींनी जल जीवन मिशन योजनेंतर्गत झालेल्या कामांची पाहणी केलेली नसून यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
जनतेच्या महत्त्वाच्या विषयांत लक्ष न घालता फक्त सत्कारावर वेळ घालत आहेत
यावेळी योग्य कारवाई न झाल्यास 26 जानेवारी 25रोजी उपोषणाचा इशारा देण्यात आला.
यावेळी अनेक गावातील ग्रामस्थ,कार्यकर्ते श्री प्रकाश खांडेकर तसेच महासंघाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते
=================== *बातम्या व जाहिराती साठी संपर्क- मनोहर गुरव*
*9890747525*
====================
*ग्रूपमधे सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/JsGFKmCyvxq9hJ2A0L15Kg
Comments
Post a Comment