*शेती पिकांसाठी धोका; महाराष्ट्रातील 'या' भागांत पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज काय?*
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
*शेती पिकांसाठी धोका; महाराष्ट्रातील 'या' भागांत पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा अंदाज काय?*
Maharashtra weather : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
.विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत ३०-४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या भागांतील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. हिवाळ्यात होणाऱ्या या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसणार आहे.
पुणे येथील ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी या भागांत पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
अरबी समुद्रातील हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.
दक्षिण केरळजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक भागांत पाऊस आणि गारपीट झाली आहे.
जवळपास १२ ते १३ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यांत ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Nowcast warning at 1900 Hrs 28 Dec: Thunderstorm with lightning,light spells of rain with gusty winds reaching 30-40 kmph very likely to occur at isol places in districts of Ahmednagar, Ch Samabajinagar, Jalgaon during nxt 3-4 hours.
Take precautions while moving out. -IMD MUMBAI pic.twitter.com/VRawj4ov0v
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 28, 2024
जळगाव जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ज्वारी, केळी आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसला आहे. जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये ज्वारी आणि पिके जमीनदोस्त झाली असून, हरभऱ्याच्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
रावेर आणि यावल तालुक्यांतील केळी उत्पादक शेतकरीही मोठ्या नुकसानाला सामोरे जात आहेत. तूर पिके काढणीच्या अवस्थेत असताना झालेल्या पावसामुळे तुरीच्या उत्पादनावरही परिणाम होईल, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. मात्र, नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाहीत.
पंचनामे लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असून, कृषी विभागाने तातडीने कारवाई करण्याची गरज आहे.
मध्यरात्री कल्याण-डोंबिवली परिसरात अचानक अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, ज्यामुळे तापलेल्या वातावरणाला काहीसा गारवा मिळाला. साधारण वीस मिनिटे पडलेल्या या पावसाने वातावरण थंड झाले. नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागांमध्येही अवकाळी पावसाचे प्रमाण दिसून आले.
या पावसाने काही भागांतील नागरिकांना गारवा दिला असला, तरी शेती पिकांवर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
*मँगो सिटी *
*70301 66666*
ड्रीम यार्ड
मल्टिपर्पज फ्री हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर
गरीब मुलासाठी मोफत राहणे, जेवणे, शिक्षण सर्व फ्री...कोणतेही चार्जेस नाहीत.
कारवांची वाडी पोलीस स्टेशन जवळ
7020843099
* राज्यभर 15 लाख + समाधानी वाचक*
* राज्यभर जाहिरात एक दिवस 1 पोस्ट 15 k फक्त
* रत्नागिरी 500 रुपये
* कोल्हापूर विभाग
* 3000 रुपये एक पोस्ट
* विदर्भ , मराठवाडा
* 5000 पर पोस्ट
* 850 पत्रकारांचे नेटवर्क
*🔘दैनिक फ्रेश न्यूज रत्नागिरी 🔘*
https://youtu.be/otzSXrlIp6o
RNI-MAHMAR/2011/39536
पत्रकार पाहीजेत.
प्रत्येक गावामध्ये दैनिक फ्रेश न्यूज साठी पत्रकार नेमणूक सुरू आहे.आपली माहिती
〽️📧
freshnewsindia24@gmail.com
या मेल वर पाठवा.
अधिक माहितीसाठी, जाहिरात व बातम्या पाठवण्यासाठी संपर्क साधा.
मोफत पत्रकारिता प्रशिक्षण
8459886437
9404362648
https://youtu.be/2__ZZA8f_6o?si=EGjDAbE8Hpp8BpuL
आमचे बिझनेस नेटवर्क
5.5 लाखात 100 % लोन वर घर..
8329264505
*मँगो सिटी रियल इस्टेट
mangocityindia@gmail.com
70301 66666
*मँगो सिटी मल्टिपर्पज हॉल ऍण्ड बिझनेस सेंटर*
ड्रीम यार्ड
कारवांचीवाडी पोलीस स्टेशन जवळ, ओम साई ओम बिल्डिंग, पूर्ण ग्राउंड फ्लोअर, कारवांचीवाडी
आपला विकास...हाच आमचा ध्यास...
गरीब मुलासाठी फ्री राहणे, जेवण, शिक्षण सोय.
https://whatsapp.com/channel/0029VaAMHiXEQIatCgImgp39
Comments
Post a Comment