विविध आश्वासने देवून कामे पूर्ण न झाल्याने महावितरण कंपनीच्या आबलोली उपकेंद्राजवळ आमरण उपोषण.
आज पर्यंत तीन वेळा उपोषण करून नुसती आश्वासने दिली गेली. आणि प्रत्यक्षात कोणतेही काम पूर्ण न झाल्याने आबलोली गावाचे माजी उपसरपंच श्री. प्रमेय प्रदीप आर्यमाने महावितरण कंपनीच्या आबलोली उपकेंद्राजवळ आमरण उपोषणास बसले आहेत. याठिकाणी फक्त पोलिस प्रशासन सोडले तर सर्वच संबंधित अधिकारी व कार्यालये यांनी पाठ फिरवली आहे. कोणीही या उपोषणाची दखल घेतलेली नाही. ज्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. तेथील शाखा अभियंता देखिल गायब आहे. तसेच उपकार्यकारी अभियंता सुद देखिल सुट्टी घेऊन कुटुंबासह सुट्टी वर गेल्याचे समजते. आरोग्य कर्मचारी देखिल उपोषण कर्त्याची प्रकृती तपासणी करण्यासाठी उपस्थित नाहीत. विशेष म्हणजे ज्या महसूल प्रशासनाला उपोषणाचे निवेदन त्यांनी दिले आहे. त्या महसूल प्रशासनाने देखिल दुर्लक्ष केले आहे. जिल्हा प्रशासन आता याकडे लक्ष देणार का? असा सवाल ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे.
Comments
Post a Comment